Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ एप्रिल, २०२२, एप्रिल २५, २०२२ WIB
Last Updated 2022-04-24T18:48:25Z
careerLifeStyleResults

Skin Care Tips : केस आणि त्वचेसाठी व्हिटॅमिन 'ई' असलेले पदार्थ खा, जाणून घ्या याचे महत्त्व

Advertisement

Skin Care Tips : उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असते. हात, पाय, त्वचा आणि ओठ कोरडे होतात. कडक सूर्यप्रकाशाचा केसांवर परिणाम होतो, त्यामुळे केसही कोरडे आणि निर्जीव होतात. उन्हाळ्यात बहुतेक लोक त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष दिले पाहिजे. त्वचा आणि केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही आहारात व्हिटॅमिन ई समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. यामुळे केस आणि त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते. व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खाऊनही कोरडेपणाची समस्या कमी करू शकता. व्हिटॅमिन ईची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही या गोष्टींना तुमच्या आहाराचा भाग बनवा.

व्हिटॅमिन ई समृध्द अन्न :

1. बदाम - बदाम हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. उन्हाळ्यात दररोज मूठभर भिजवलेले बदाम खावेत. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात मिळते. बदाम खाल्ल्याने त्वचा आणि केस मुलायम होतात.

2. सूर्यफुलाच्या बिया - शरीरातील व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी बियांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. बिया खाल्ल्याने केस गळणे, पांढरे होणे आणि रुक्षपणाची समस्या कमी होते. व्हिटॅमिन ई साठी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता. आपण सूर्यफूल तेल देखील वापरू शकता.

3. एवोकॅडो - फळांमध्ये एवोकॅडो जरूर खा. हे फळ महाग असले तरी याच्या सेवनाने तुमची त्वचा आणि केस चमकू लागतील. व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही एवोकॅडोला आहाराचा एक भाग बनवा. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन-सी देखील आढळतो.

4- शेंगदाणे - व्हिटॅमिन ई साठी तुम्ही शेंगदाण्याला तुमच्या आहाराचा एक भाग बनवू शकता. जेवणात शेंगदाणे कोणत्याही प्रकारे वापरा. उन्हाळ्यात शेंगदाणे भिजवून चटणी करून खाऊ शकता. याशिवाय शेंगदाणे सर्व ऋतूंमध्ये स्नॅक्सच्या स्वरूपात खाऊ शकतात.

5- हिरव्या पालेभाज्या - हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई देखील आढळते. विशेषत: पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते. यासाठी पालकाचा आहारात नक्कीच समावेश करा. आयर्न आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता पालक खाल्ल्याने भरून काढता येते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/BRKYW3V Care : चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी; होऊ शकतात गंभीर आजार

<a href="https://ift.tt/e4OaEAG Tips :वजन वाढेल, दातही खराब होतील! कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने पोहोचेल आरोग्याला हानी, जाणून घ्या..

<a href="https://ift.tt/ZrKl3Os Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care Tips : केस आणि त्वचेसाठी व्हिटॅमिन 'ई' असलेले पदार्थ खा, जाणून घ्या याचे महत्त्वhttps://ift.tt/BpRw2Ao