Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, १० एप्रिल, २०२२, एप्रिल १०, २०२२ WIB
Last Updated 2022-04-10T11:43:48Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

SSS CPO : जुन्नरची किर्ती पादीर सशस्त्र सीमा दलात सब इन्स्पेक्टर ! तालुक्यातून पहिली मुलगी सेनादलात, ग्रामीण भागातील मुलींना केलं ‘हे’ आवाहन Rojgar News

Advertisement
कु. किर्ती बाळासाहेब पादीर

जुन्नर : जुन्नर (Junnar) तालुक्यातील व्हरूडी येथील शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पादीर यांच्या मुलीची कु. किर्ती बाळासाहेब पादीर हिची SSS CPO (SSS CPO) परिक्षेअंतर्गत सशस्त्र सीमा दलात सब-इन्स्पेक्टर ( Sub Inspector) पदी निवड झालीये. सेनादलातील तालुक्यातील पहिली मुलगी म्हणून किर्ती पादीरने मान मिळवलाय. तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर ती सध्या बिहार राज्यातील भारत- नेपाळ सीमेवर हजर झाली आहे. जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक महासंघाच्या आधिवेशनामध्ये तिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील मुलींना सैन्यदलात भरती होण्याचे आवाहन

देशातील सर्व मुलींना विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना सैन्यदलात भरती होण्याचे आवाहन किर्ती पादीरने यावेळी केलंय. या क्षेत्रात काम करताना यात मुलींचा समावेश कमी असल्याचं फार प्रकर्षानं जाणवलं असल्याची खंत किर्ती पादीरने म्हटलंय. आई वडिलांचा असा विचार असतो कि आपल्या मुलाने देशसेवेत सहभागी व्हावे पण संरक्षण दलामध्ये सुद्धा मुलींना खूप जास्त संधी उपलब्ध आहेत. प्रशिक्षणा दरम्यान फक्त सीमेचंच नाही तर स्वतःच संरक्षण देखील कसं करायचं यांचं प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी सहभाग नोंदवावा. असंही किर्ती पादीर यावेळी म्हणालीये.

आम्हाला तिचा अभिमान आहे !

सशस्त्र सीमा दलात सब-इन्स्पेक्टर पदी निवड झालेल्या किर्ती पादीरची आई माध्यमांशी बोलताना म्हणाली, शिक्षण घेताना माझ्या मुलीचा कल हा स्पर्धा परीक्षांकडेच होता. या भारतमातेसाठी आपलं काहीतरी देणं लागतं. आमच्या घरालाही देश सेवेचं वेड होतंच. आपल्या मातीसाठी आपलीही काही कर्तव्य आहेत. महाराष्ट्राचंही नावलौकिक झालं पाहिजे. आपणही देशासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं त्यामुळे आम्हीही तिला प्रोत्साहन दिलं.आम्हाला तिचा अभिमान आहे.

 

इतर बातम्या :

Video : गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीला अपघात, ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तीन जण गंभीर जखमी

KKR vs DC, IPL 2022 : ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरमध्ये वर्चस्वाची लढाई, दोघांकडून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न

Jalna | जालन्यात तीन तालुक्यात गावठाणचे ड्रोनद्वारे मोजणीचे काम पूर्ण, आता पाच तालुक्यांची मोजणी होणार: राजेश टोपे


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: SSS CPO : जुन्नरची किर्ती पादीर सशस्त्र सीमा दलात सब इन्स्पेक्टर ! तालुक्यातून पहिली मुलगी सेनादलात, ग्रामीण भागातील मुलींना केलं ‘हे’ आवाहनhttps://ift.tt/v4l7wse