TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक

<a href="https://ift.tt/MlR13xr Water Benefits : तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी लाभदायक असते. ही आपल्या देशातील एक पुरातन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये ही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. आयुर्वेदामध्ये चिकित्सा पद्धतीचाी हा एक भाग आहे. तांब्याच्या भांड्यातील पाण्याचं सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात. जुलाब, पोटदुखी, अतिसार यांसारख्या आजारांपासून सुटका होते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने शरीरातील तांब्याची गरज पूर्ण होते आणि शरीरात तांब्याची कमतरता भासत नाही. पण तांब्याच्या भांड्यातील पाणी कधी पिऊ नये, तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर आहे हे तुम्हाला माहित आहे का, यासाठी खालील माहिती वाचा.

तांब्याच्या भांड्यातील पाणी कधी पिऊ नये?
जेवणानंतर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिऊ नये. असं केल्यास तुमच्या शरीरावर याचा वाईट परिणाम होईल. यामुळे पचन संथ गतीनं होऊ शकतं किंवा पोटदुखीची समस्याही उद्भवू शकते. सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याची उत्तम वेळ आहे. सकाळी उठल्यानंतर तोंड धुतल्यावर सर्वप्रथम तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी प्यावं.

तांब्याच्या भांड्यात किती पाणी वेळ ठेवावं?
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचा फायदा मिळवण्यासाठी हे पाणी तांब्याच्या भांड्यात किंवा भांड्यात 12 ते 48 तास ठेवा आणि नंतर सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात दिवसभर पाणी प्यायचे असेल तर त्यात काहीही नुकसान नाही. पण 48 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवलेलं पाणी पिऊ नका.

तांब्याचे पाणी पिण्याचे तोटे
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचं कोणतंही नुकसान नाही. पण जेव्हा तुम्ही हे पाणी जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने जास्त काळ वापरता तेव्हा शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होते. असे झाल्यास तुम्हाला मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे किंवा अतिसार यांसारखी लक्षणं दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून पाण्याचं सेवन करत राहिल्यास यकृत निकामी आणि किडनीचे आजारही होऊ शकतात.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Copper Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूकhttps://ift.tt/1WeIksR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या