Kids Immunity : लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असते. विशेषत: पाच वर्षापर्यंतच्या लहान मुले अधिक आजारी पडतात. त्यामुळे वारंवार आजारी पडणाऱ्या लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाकाळात घरातच राहिल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत झाली आहे. जन्मानंतर प्रथमच बाहेर जाणारी दोन - तीन वर्षांची मुलं इतर मुलांपेक्षा जास्त आजारी पडत आहेत. यामागचं कारण म्हणजे लहान मुलं पहिल्यांदाच बाहेरील वातावरणात खेळणं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कारण मुलांना बाहेरील वातावरणाची सवय नाही. याआधी लहान मुलं घरी राहिल्यानं आजारी पडत होती, मात्र अशी मुले घरातून बाहेर पडल्याने आजारी पडत आहेत. जर तुमचे मूलं देखील वारंवार आजारी पडत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. यामागील कारण काय असू शकते आणि मुलाला आजारी पडण्यापासून कसे वाचवायचे ते जाणून घ्या.

1. प्रतिकारशक्ती वाढवा.

कोणत्याही आजारांपासून दूर राहण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. मुलांची प्रतिकारशक्ती वयानुसार हळूहळू वाढते. त्यामुळे मुलांना योग्य पौष्टीक आहार देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांचं वजन वाढेल. लहान मुलांना हंगामी फळे, भाज्या, अंडी, दूध, चीज आणि इतर सकस आहार द्या.

2. जंतांचे औषध द्या.

अनेक वेळा मुलांच्या पोटात कृमी म्हणजेच जंत होतात, त्यामुळे मूल चिडचिड होऊन लवकर आजारी पडते. अशा परिस्थितीत मुलाला काही खावे-पिवेसे वाटत नाही. जर तुमच्या मुलांचे वजन कमी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दर सहा महिन्यांनी मुलाला जंताचं औषध द्या.

3. फ्लूचा शॉट घ्या.

जर लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल, तर बदलत्या मोसमात व्हायरलची लस घ्यावी. यामुळे सर्दी-पडसे आणि व्हायरल फ्लूपासून लहान मुलांचं मोठ्या प्रमाणात संरक्षण होईल.

4. मल्टीविटामिन द्या.

लहान मुलांना दररोज मल्टीविटामिन द्या. यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत होईल आणि मुलाच्या शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता दूर होईल. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांना काही प्रोटीन सप्लिमेंट देणेही त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर राहील.

5. आहारावर लक्ष द्या.

आजकाल मुलं जंक फूड खूप खातात. मॅगी, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, चिप्स, केक हे पदार्थ सगळ्याच मुलांना आवडतात. मुलांना या गोष्टींपासून शक्य तितकं दूर ठेवा आणि त्यांना पौष्टिक आहार द्या. मुलांना घरीच बनवलेल्या ताज्या हिरव्या भाज्या, रोटी, भात, डाळी, अंडी, चीज, दूध, दही खायला द्या. मुलांच्या आहारात दिवसातून दोन - तीन वेळा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : मुलांचं वजन कमी होतंय? मुलं सारखी आजारी पडतायत? 'ही' आहेत यामागची कारणंhttps://ift.tt/D8SfcRZ
0 टिप्पण्या