TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Mumbai University: पहिली गुणवत्ता यादी 29 जूनला; मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर Rojgar News

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया 9 जून 2022 पासून सुरू केली आहे. पहिली गुणवत्ता यादी (First Merit list) 29 जूनला जाहीर होणार आहे. या प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रियेबाबतचे पुढील वेळापत्रक (Timetable) मुंबई विद्यापीठाने सोमवारी जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार आता महाविद्यालयातील पुढील पदवी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या वेबसाइटवर सुरू असून हेल्पलाइन क्रमांकसुद्धा या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पहिली गुणवत्ता यादी
29 जून 2022 (सकाळी 11 वाजता)
कागदपत्रे पडताळणी आणि ऑनलाइन शुल्क सुविधा (हमीपत्रासह)
30 जून ते 6 जुलै 2022 (3 वाजेपर्यंत)

दुसरी गुणवत्ता यादी
7 जुलै 2022 (सकाळी 11 वाजता)
ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि ऑनलाइन शुल्क सुविधा (हमिपत्रासह)
8 ते 13 जुलै 2022 (3 वाजेपर्यंत)

तिसरी गुणवत्ता यादी
14 जुलै 2022 (सकाळी 11 वाजता)
ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी आणि ऑनलाइन शुल्क सुविधा (हमिपत्रासह)
14 जुलै ते 16 जुलै 2022

प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक

अर्ज विक्री (ऑनलाइन/ऑफलाइन)- 9 ते 25 जून 2022 (1 वाजेपर्यंत)
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया- 9 ते 25 जून 2022 (1 वाजेपर्यंत)
ऑनलाइन फॉर्म सादर करण्याची तारीख- 9 ते 25 जून 2022 (1 वाजेपर्यंत)
(प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस ॲडमिशन प्रवेश आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येतील.

अतिरिक्त जागांसाठी परवानगी लागणार

सद्याची परिस्थिती पाहता CBSE व ICSE मंडळाच्या विद्यार्थ्यांचे बारावीचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. मात्र, सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालयांनी आणि संस्थांनी विहित मुदतीत विद्यापीठाकडे अतिरिक्त जागांसाठी परवानगी मागून महाविद्यालयातील गुणवत्ता यादी कट-ऑफनुसार या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावं, असं परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी स्पष्ट केलं.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mumbai University: पहिली गुणवत्ता यादी 29 जूनला; मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीरhttps://ift.tt/qhOPlWk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या