TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

NEET UG 2022: ‘नीट’ची तयारी करायची की ‘सीयूईटी’ची? नीट पुढे ढकलण्याची मागणी! तारखा एकाच वेळी Rojgar News

नीट पुढे ढकलण्याची मागणी!

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एनईईटी यूजी (NEET UG) परीक्षेसाठी जाहीर केले आहे की, सीयूईटी यूजीची पहिली परीक्षा 15 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. एनटीएने ही तारीख जाहीर केल्यापासून विद्यार्थी नीट यूजी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. 17 जुलै रोजी होणाऱ्या नीट यूजी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, या तारखेच्या आसपास अनेक महत्त्वाच्या परीक्षा आहेत, CUET 2022 (CUET Exam 2022) ही परीक्षाही याच काळात होणार आहे. त्यामुळे त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाहीये. आता यूजी नीटच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी ट्विट #postponeneetug2022 (#postponeneetug2022) करून आपला आवाज आणखी तीव्र केलाय आहे. एकप्रकारे विद्यार्थी ऑनलाइन आंदोलनच करत आहेत.

विद्यार्थी ट्विट करतायत

नीट यूजीचे विद्यार्थी सोशल मीडियावर आवाज उठवत आहेत. #postponeneetug2022 विद्यार्थ्यांकडून ट्विटरवर ट्रेंड होत आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ट्विट केलं आहे. एका ट्विटर यूजरने लिहिले की, नीट यूजीच्या उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून आदराने शांततेत विरोध केला आहे. विद्यार्थ्यांच्या या विरोधाला प्रतिसाद मिळेल का? यावर सुनावणी होईल का? असा प्रश्न युजरने उपस्थित केलाय. ट्विटरवर विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत.

CUET 2022 ही परीक्षाही याच काळात

झालंय असं की नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 2022 या वर्षासाठी जुलै 2022 मध्ये अनेक मोठ्या स्पर्धा परीक्षांच्या तारखा निश्चित केल्यात. या परीक्षांमध्ये जेईई मेन 2022 सत्र परीक्षा 21 जुलै ते 3 जुलै दरम्यान होणार आहे. त्याचबरोबर नवीनच सुरु झालेली राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा CUET 2022 ही परीक्षाही याच काळात होणार आहे. बऱ्याच परीक्षा एकाच काळात होतायत. 17 जुलैला यूजी नीट 2022 परीक्षेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय आणि त्याच वेळी, त्या दरम्यान सीयूईटी घेण्यात येणारे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यूजी नीट 2022 परीक्षा पुढे ढकलून हवीये.

तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे

एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या परीक्षांमुळे आम्हाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एनईईटी यूजी हे आमचे भविष्य आहे, आमचे करिअरचे स्वप्न आहे. आम्हाला आमचं वर्ष वाया घालवायचं नाहीये. त्यामुळे ही परीक्षा काही दिवस पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी ट्विटरवर करतायत.

या अभ्यासक्रमांना एनईईटी यूजीच्या माध्यमातून प्रवेश मिळतो

नीट यूजी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष पदवी, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी लाइफ सायन्सेस आणि व्हेटर्नरी मेडिसीन या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट पीजी परीक्षा घेतली जाते.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: NEET UG 2022: ‘नीट’ची तयारी करायची की ‘सीयूईटी’ची? नीट पुढे ढकलण्याची मागणी! तारखा एकाच वेळीhttps://ift.tt/TEMW0oe

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या