Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
शनिवार, २५ जून, २०२२, जून २५, २०२२ WIB
Last Updated 2022-06-25T02:48:11Z
careerLifeStyleResults
Right To Abortion : अमेरिकेत महिलांकडून गर्भपाताचा अधिकार हिरावला, US सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Advertisement
Right To Abortion : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (US Supreme Court) गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील गर्भपाताचे संवैधानिक अधिकार (Right To Abortion) संपले आहे. आता अमेरिकेतील सर्व राज्ये गर्भपाताबाबत त्यांचे स्वतंत्र नियम बनवतील. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठाने 5-4 बहुमताने रो विरुद्ध वेडचा निर्णय रद्द केला, ज्यामध्ये गर्भपाताला घटनात्मक अधिकार देण्यात आला होता. खंडपीठाने, सहा-तीन बहुमताने आपल्या निर्णयात, रिपब्लिकन-समर्थित मिसिसिपी राज्याचा गर्भपातावर बंदी घालणारा कायदा कायम ठेवला. बहुमताचा निकाल देताना न्यायमूर्ती सॅम्युअल अलिटो म्हणाले की, संविधान गर्भपाताच्या अधिकाराची तरतूद करत नाही. न्यायालयाने सुमारे 50 वर्षे जुना ऐतिहासिक 1973 "रो व्ही वीड" निर्णय रद्द केला. या निर्णयानंतर आता राज्यांना आपापल्या परीने वेगवेगळे कायदे करता येणार आहेत. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या विभाजित राज्यांमध्ये गर्भपाताबद्दल भिन्न विचार आहेत.
The Supreme Court voted 6 to 3 to overturn Roe v. Wade, ending the constitutional right to an abortion.
1973 चा निकाल काय होता?
युनायटेड स्टेट्समध्ये 1973 मध्ये, रो व्ही वीड" निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात हा घटनात्मक अधिकार म्हणून मान्य केला. गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत काय करावे हे ठरवण्याचा अधिकार महिला आणि तिच्या डॉक्टरांना आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. 1992 मध्ये सुप्रीम कोर्टाने पेनिलवेनियन विरुद्ध कैसी प्रकरणात गर्भपाताचा अधिकार कायम ठेवला.
"रो व्ही वीड" प्रकरण काय ?
जेन रो उर्फ ​​नॉर्मा मॅककॉर्वे ही 22 वर्षांची अविवाहित आणि बेरोजगार महिला होती. जी 1969 मध्ये तिसऱ्यांदा गर्भवती झाली. टेक्सासमध्ये गर्भपात बंदीसाठी तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. गर्भपाताच्या संदर्भात तिच्या बाजूने निकाल येईपर्यंत तिने एका मुलीला जन्म दिला होता. हेन्री वेड हे डॅलस काउंटी, टेक्सासमधील सरकारी वकील होते ज्यांनी गर्भपाताच्या अधिकारांना विरोध केला होता. या कारणास्तव हे प्रकरण "रो व्ही वीड" म्हणून ओळखले जाते.
न्यायालय आणि देशासाठी दुःखद दिवस - बायडेन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या निकालाला "न्यायालय आणि देशासाठी दुःखद दिवस" ​​म्हटले आहे. हा निर्णय देशाला 150 वर्षे मागे घेऊन जाईल, असे ते म्हणाले. महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी वाट्टेल ते करण्याचा त्यांनी संकल्प केला.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
न्यायालयाने असे मानले की, संविधान गर्भपाताचा कोणताही संदर्भ देत नाही आणि अशा कोणत्याही अधिकाराला कोणत्याही घटनात्मक तरतुदीद्वारे स्पष्टपणे संरक्षित केले जात नाही. 1973 च्या निर्णयाला नाकारल्यास पुन्हा वैयक्तिक यूएस राज्यांना गर्भपातावर बंदी घालण्याची परवानगी मिळेल. किमान 26 राज्यांनी तत्काळ किंवा लवकरात लवकर असे करणे अपेक्षित आहे.
गर्भपाताचा प्रश्न का निर्माण झाला?
वास्तविक, अलीकडे अमेरिकेत गर्भपाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महिलांना गर्भपाताचा अधिकार द्यायचा की नाही यात धार्मिक घटकांचाही सहभाग आहे. रिपब्लिकन (कंझर्व्हेटिव्ह) आणि डेमोक्रॅट्स (लिबरल्स) यांच्यातही हा वादाचा मुद्दा आहे. हा वाद 1973 मध्ये सुप्रीम कोर्टात पोहोचला, जो रो विरुद्ध वेड केस म्हणून ओळखला जातो.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Right To Abortion : अमेरिकेत महिलांकडून गर्भपाताचा अधिकार हिरावला, US सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयhttps://ift.tt/roPzEiN