Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १६ जुलै, २०२२, जुलै १६, २०२२ WIB
Last Updated 2022-07-16T03:48:34Z
careerLifeStyleResults

Monsoon Immunity : पावसाळ्यात 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा, आजारांपासून सुरक्षित राहा

Advertisement

<a href="https://ift.tt/PMraj9I Immunity Boosting Tips : पावसाळ्यात वातावरणात अनेक बदल झाल्याने आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. यामुळे अशा वेळी आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचं आहे. उन्हाळ्यात कडाक्याच्या गरमीनंतर अचानक पावसामुळे वातावरण थंड (Humidity) झाल्याने शरीराला बदलत्या वातावरणात रुळण्यास वेळ लागतो. यामुळे पावसाळ्यात लोक जास्त आजारी पडतात. पावसाळ्यात ताप (Fever), सर्दी-पडसं (Cold), कफ (Cough), खोकला तर कधी फ्लू (Flu) यांसारखे संसर्गजन्य आजार अधिक वेगानं पसरतात. याशिवायो पोटासंबंधिक विकारांचा धोकाही बळावतो.

बदलत्या वातावरणात आरोग्याची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळे तुमचं आजारांपासून संरक्षण होतं. पावसाळ्यात आजारांना दूर ठेवायचं असेल तर तुमची इम्युनिटी (Immunity) रोगप्रतिकार क्षमता वाढवणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही योग्य संतुलित आहार घेतला पाहिजे. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करा.

आल्याचा चहा
पावसाळ्यात आल्याचा चहा फायदेशीर ठरतो. आल्याचा प्रभाव गरम असतो आणि त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ, अँटीफंगल आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. यामुळे बॅक्टेरिया, विषाणूंसोबतच सर्दी आणि फ्लूसारख्या समस्याही तुमच्यापासून दूर राहतात.

हळदीचे दूध
पावसाळ्यात तुम्ही हळदीचे दूध सेवन करू शकता. हळद असलेले दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आणि शरीराला आतून मजबूत करण्याचे काम करते.

ज्येष्ठमधाचे सेवन
ज्येष्ठमध आयुर्वेदिक औषधी आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम करते. तसेच सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून शरीराचं संरक्षण करते. तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी ज्येष्ठमध पावडर दुधासोबत घेऊ शकता. याचे प्रमाण ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण याचे प्रमाण तुमचे वय आणि आरोग्यानुसार बदलू शकते.

या सवयी लावा

गुळण्या करणे.

वाफ घ्या.

गरम पाणी प्या.

चालणे किंवा धावणे याला जीवनशैलीचा भाग बनवा.

योग करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Jft1L0S Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? 'या' गोष्टींपासून दूर राहा, पाहा यादी

<a href="https://ift.tt/76flPme Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा

<a href="https://ift.tt/sZMoOmE : थायरॉइड झाल्यावर चहा पिणं योग्य? जाणून घ्या सविस्तर

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Monsoon Immunity : पावसाळ्यात 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा, आजारांपासून सुरक्षित राहाhttps://ift.tt/bmq9cBN