TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Mumbai University: खुशखबर! मुंबई विद्यापीठ राबविणार मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम! भाषा संवर्धनाचा अनोखा उपक्रम, ऑनलाइन प्रवेश Rojgar News

Mumbai University

मुंबई: मराठी भाषा (Marathi Language) प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर अमराठी असाल आणि तुम्हाला मराठी शिकायची आवड असेल तर तुम्हाला आता मराठी शिकण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आता मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑफलाइन, ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून विद्यार्थी 15 जुलैपर्यंत प्रवेश घेऊ शकतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत अनेक लोक शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि इतर कारणास्तव वास्तव्यासाठी येत असतात; मात्र मराठी भाषा येत नसल्याने त्यांना या शहरात वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा लोकांसाठी मुंबई विद्यापीठ मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course For Marathi Language) राबवीत आहे.

अभ्यासक्रमाचा नक्कीच फायदा होईल

महाराष्ट्रात मराठी ही व्यवहार भाषा आहे. त्यामुळे या भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे. मराठी अभाषिकांचा संवाद वाढावा आणि मराठी भाषेशी त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठीच विद्यापीठाच्या मराठी विभागाने अभाषिकांसाठी मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. मराठी शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना या अभ्यासक्रमाचा नक्कीच फायदा होईल. इथल्या मातीशी, इथल्या भाषेशी आणि संस्कृतीशी त्यांचे नाते अधिक घट्ट व्हावे हा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

इच्छुक उमेदवार मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात किंवा अन्य दोन केंद्रावर जाऊन प्रवेश घेऊ शकतात

ऑनलाईन प्रवेशासाठी

Parttimecourses.mu.ac.in या लिंकवर जाता येईल.

संपर्क

  1. प्रवीण मुळम – 8108301602
  2. तुषार मांडवकर-  7774947476
  3. डॉ. लीना प्रभू – 9833497119
  4. अक्षय जमदाडे- 8766958875

मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रम

  • विद्यार्थ्यांना अनेक सुविधा विद्यापीठ देणार असून यामध्ये अभ्यास साहित्य, ग्रंथ, भाषा शिकवणारे तज्ज्ञ प्राध्यापक आणि भाषेविषयक संदर्भ दिले जाणार आहेत. मुख्य केंद्रावरून तसेच अन्य केंद्रांमधून हा अभ्यासक्रम शिकवला जाईल.
  • सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले होते. मुख्यत: अभ्यासक्रमकेंद्री उपक्रम राबवून भाषा आणि साहित्यविषयक जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. अभाषिकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा त्याचाच एक भाग आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून विभागाने या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. भाषिक कौशल्यांवर भर देऊन अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे.

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mumbai University: खुशखबर! मुंबई विद्यापीठ राबविणार मराठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम! भाषा संवर्धनाचा अनोखा उपक्रम, ऑनलाइन प्रवेशhttps://ift.tt/7FkxmTv

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या