Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२, ऑगस्ट २६, २०२२ WIB
Last Updated 2022-08-25T21:20:41Z
careerLifeStyleResults

26th August 2022 Important Events : 26 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

Advertisement

26th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 25 ऑगस्ट. श्रावण महिना सरत आला आहे. आणि आज जरा-जिवंतिका पूजन आहे. श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. त्याचप्रमाणे, पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 26 ऑगस्ट दिनविशेष.

जरा-जिवंतिक पूजन :

श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.

पोळा :

पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो.  नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’

अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (तिथीप्रमाणे).

अहिल्याबाई होळकर या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय आणि सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. 1766 ते इ.स. 1795, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.

पिठोरी अमावस्या

श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.

इ.स. 1303 साली खिलजी राजवंशीय शासक अल्लाउद्दीन खिलजी यांनी चित्तोडगढ चे शासक रतन सिंह यांच्या विरुद्ध युद्ध पुकारून चित्तोडगढ आपल्या ताब्यात घेतला.

1910 : भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म.

1910 साली शांततेचा नोबल पुरस्कार तसचं, भारतीय सर्वोच्च नागीर पुरस्कार भारतरत्न सन्मानित  अल्बेनियन-भारतीय रोमन कॅथोलिक धर्मगुरू व समाजसेविका मदर टेरेसा यांचा जन्मदिन.

1944 : लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/v8fz6gl Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/3HCfKVA 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 26th August 2022 Important Events : 26 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/IlLGMhH