Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२, ऑगस्ट ०८, २०२२ WIB
Last Updated 2022-08-08T02:48:24Z
careerLifeStyleResults

Health News : केळी खाल्ल्यानं कॅन्सरपासून बचाव होईल, अभ्यासात काय म्हटलंय, वाचा सविस्तर

Advertisement

Banana and Cancer : तुम्हाला कॅन्सरपासून स्वत:चं संरक्षण करायचं असेल तर, आहारात केळ्याचा समावेश नक्की करा. केळी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे आपल्या शरीराचं अनेक आजारांपासून संरक्षण होतं. बहुतेक लोक शरीर धष्ट-पुष्ठ करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी आहारात केळ्याचा समावेश करतात. पण केळीचे इतर फायदे तुम्हाला माहित नसतील. एका अभ्यासात उघड झालं आहे की, केळ्यामुळे कॅन्सरपासून संरक्षण होऊ शकते. केळी खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.

एका संशोधनात असं समोर आलं आहे की, केळ्याच आहारात समावेश केल्याने तुमचं कॅन्सरपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. केळ्यामधील रजिस्टेंट स्टार्च (Resistant Starch) यामध्ये परिणामकारक ठरते. केळ्याशिवाय इतर भरपूर प्रमाणात रजिस्टेंट स्टार्च असलेल्या खाद्यपदार्थांमुळेही तुमचं कॅन्सरपासून संरक्षण होईल. एका अभ्यासात हे आढळून आलं आहे.

संशोधनात काय समोर आलं?

मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, रजिस्टेंट स्टार्च (Resistant Starch) कार्बोहायड्रेस युक्त असतात. रेझिस्टन्स स्टार्च हा जटिल पिष्टमय पदार्थाचा एक प्रकार असून हे पचायला जास्त वेळ लागतो. हे स्टार्च छोट्या आतड्यांमधून मोठ्या आतड्यापर्यंत जाते आणि तेथे या स्टार्चचं पचन होतं. रजिस्टेंट स्टार्च वनस्पती आधारित अन्नपदार्थांमध्ये आढळतो. यामध्ये केळी, तांदूळ, तृणधान्यं, बीन्स, शिजवलेला किंवा कच्चा पास्ता याचा समावेश आहे.

रजिस्टेंट स्टार्च

रजिस्टेंट स्टार्च हा फायबरचा एक भाग आहे, यामुळे कर्करोग आणि इतर अनेक रोगांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. अमेरिकेच्या न्यू कॅसल आणि लीड्स विद्यापीठाच्या अभ्यासातून असं समोर आलं आहे की रजिस्टेंट स्टार्च पावडर देखील लिंच सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करू शकते.

रोज केळी खाणं फायदेशीर

संशोधनात असं आढळून आलं आहे की, दररोज 30 ग्रॅम रजिस्टेंट स्टार्च खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते. 30 ग्रॅम रजिस्टेंट स्टार्च एक कच्च्या केळीच्या समान आहे. संशोधनात, सुमारे 10 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर डेटा गोळा करण्यात आला.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर संबंधित बातम्या

<a href="https://ift.tt/UMZADdx Health : कोविड संसर्गामुळे वाढतो ह्रदयविकाराचा धोका, काय आहे यामागची कारणं?

<a href="https://ift.tt/Juz9wAL Tips : निरोगी राहण्यासाठी आहारात करा ब्रोकोलीचा समावेश; मिळतील अनेक फायदे

<a href="https://ift.tt/D7NOXRE tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे; जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health News : केळी खाल्ल्यानं कॅन्सरपासून बचाव होईल, अभ्यासात काय म्हटलंय, वाचा सविस्तरhttps://ift.tt/VmvLDwK