Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२, ऑगस्ट २४, २०२२ WIB
Last Updated 2022-08-24T00:48:09Z
careerLifeStyleResults

Paryushan Parv 2022 : आजपासून सुरु झालं पर्युषण पर्व; जैन बांधवांसाठी या उत्सवाचं महत्त्व नेमकं काय? जाणून घ्या

Advertisement

Paryushan Parv 2022 : जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व (Paryushan Parv 2022) आजपासून सुरू झालं आहे. पुढील आठ दिवस जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व साजरा करतात. तर, दिगंबर समुदायातील जैन बांधव 10 दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचं पालन करतात. पर्युषण पर्व सुरू होण्यापूर्वीच जैन बांधवांनी सर्व मंदिर, धार्मिक स्थळांची साफसफाई पूर्ण करतात. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठं पर्व मानलं जातं आणि त्यामुळे याला पार्वधिराज असंही म्हटलं जातं.
पर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचं पालन केलं जातं. या पाच सिद्धांतांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (गरजेपेक्षा अधिक धन जमा न करणे) यांचा समावेश आहे.

पर्युषण पर्व म्हणजे?

श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व हा 8 दिवसांचा असतो. तर दिगंबर जैन बांधवांचा सण हा 10 दिवसांचा असतो. श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व संपल्यावर दिगंबर जैन बांधवांचा पर्युषण पर्व सुरु होतं. या वर्षी 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व आहे. जैन बांधव या पर्युषण पर्व सणाच्या काळात मनातील सर्व क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व गोष्टींवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडत असल्याची मान्यता आहे. मनात येणारे तामसिक विचार दूर करण्याचा उपवास म्हणजेच पर्युषण असे म्हणतात. पर्युषणचा सामान्य अर्थ आहे की, या उत्सवात आपल्या मनात येणारे सर्व वाईट विचारांपासून सुटका. जैन बांधवांचा पर्युषण पर्व हा सण भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरू राहतो. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या 10 नियमांचे पालन करुन पर्युषण पर्व साजरा करतात. हिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव जैन धर्माचं मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो.

विविध व्रतांचं पालन :

जैन धर्मातील दिगंबर पंथामधील अनुयायी पर्युषण पर्वच्या काळात 10 दिवस विविध व्रतांचं पालन करतात. यासाठी या पर्युषण पर्वाला दशलक्षणा पर्व असंही म्हणतात. त्याचवेळी श्वेतांबर पंथामधील लोक आठ दिवस हा उत्सव साजरा करतात म्हणून या पंथातील अनुयायी अष्टिक म्हणून पर्युषण साजरा करतात.

जैन धर्माच्या मुख्य तत्वावर चालण्याचा मार्ग

हिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव जैन धर्माचं मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो. या उत्सवाच्या काळात जैन धर्मिय बांधव संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात आणि आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. पावसाळ्यात साजरा होणारं हे पर्युषण पर्व समाजाला निसर्गासोबत जोडण्याचं प्रशिक्षण देतो. या उत्सवात जैन समाजातील बांधव संपूर्ण भक्तीभावाने धार्मिक उपवास करतात.

पर्युषण पर्व (Paryushan Parv) पावसाळ्यात असतो. पावसाळ्यातील चार महिन्यात पृथ्वीतलावर सर्वत्र हिरवळ वाढते. या काळात बऱ्याच प्रकारचे प्राणी, सूक्ष्मजीव जन्माला येतात. वाटेत चिखल किंवा पाणी साचल्यामुळे मार्गावर चालता येत नाही. हे सर्व लक्षात घेऊन जैन साध्वींनी या काळात एकाच ठिकाणी राहून देवाची उपासना करण्याची व्यवस्था केली. या काळात प्रवचन, धर्मसाधना, प्रार्थना केल्या जातात.

पर्युषण पर्वाच्या काळात अनुयायी करता ही प्रमुख कामे :

1. पर्युषण पर्वाच्या काळात सर्व भाविक धार्मिक ग्रंथांचं वाचन करतात.
2. धार्मिक प्रवचन ऐकले जातात.
3. पर्युषण पर्वाच्या काळात भाविक उपवासही करतात. पुण्य लाभावे यासाठी दान देणं हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
4. जैन मंदिरांची विशेषत: साफ सफाई करुन स्वच्छता केली जाते, सजावट केली जाते.
5. पर्युषण पर्वाच्या काळात रथयात्रा किंवा मिरणवणुका काढल्या जातात.
6. या काळात मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक भोजनाची व्यवस्था केली जाते.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/k9N5aSy Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/PZnf42j 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Paryushan Parv 2022 : आजपासून सुरु झालं पर्युषण पर्व; जैन बांधवांसाठी या उत्सवाचं महत्त्व नेमकं काय? जाणून घ्याhttps://ift.tt/I4o6HrE