Health Tips : फळांवर मीठ किंवा साखर टाकून खाताय? तर सावधान! होईल नुकसान

Health Tips : फळांवर मीठ किंवा साखर टाकून खाताय? तर सावधान! होईल नुकसान

<a href="https://ift.tt/YeofsQS Effects of Putting Salt on Fruits : फळं खाणं आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर असतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे. फळं खाणं प्रत्येकालाचा आवडतं. अनेकदा लोक फळांचा सॅलड बनवून खातात. यावेळी बहुतेक जण फळांवर मीठ, साखर किंवा चाट मसाला टाकून फळं खातात. यामुळे फळांची चव वाढते. आपण अनेकदा काकडी, कांदा आणि गाजर यांचं सॅलड बनवत यावरही मीठ किंवा चाट मसाला टाकून खातो. काहीवेळा लोक फळाचा गोडवा वाढवण्यासाठी फळ कापून त्यावर साखर टाकून खातात. जर तुम्हालाही कापलेली फळं वरून साखर, मीठ किंवा चाट मसाला घालून खायला आवडत असतील तर काळजी घ्या. अशा प्रकारे फळांचं सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये म्हणून फळांचे सेवन करण्याची योग्य पद्धत काय आहे जाणून घ्या.

फळांवरल साखर किंवा मीठ टाकून खाणे हानिकारक

अनेकांनी टरबूजावर मीठ शिंपडून तसेच पेरूवर चाट मसाला किंवा मीठ शिंपडून खाल्लंच असेल. बरेचदा लोक ताजी फळं कापून त्यावर मीठ घालून किंवा त्याचं सॅलड बनवून खाणं पसंत करतात. मात्र हे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने होईल नुकसान

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळावर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्वे निघून जातात. त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते. जर तुम्ही फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही मिसळून खाल्लात तर शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते, कारण चाट मसाल्यातही मीठ असते. हे शरीराला नुकसानदायक आहे.

फळांवर साखर टाकून खाण्याचे दुष्परिणाम

फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. फळांमध्ये ग्लुकोज असते. यामुळे फळांचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात. अशात तुम्ही फळांवर अधिक साखर टाकून खाल्याने शरीरात साखरेचं प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. शिवाय शरीरातील साखरेचं प्रमाण वाढण्यासह वजनही वाढू शकते. डायबेटीजच्या रुग्णांसाठी हे फारच नुकसानदायक आहे.

अशाप्रकारे करा फळांचं सेवन

फळांचे सेवन करण्याचा एक योग्य पद्धत आहे. अनेकदा लोक ताज्या फळांपासून बनवलेलं सॅलड जेवणासोबत खातात. भारतीय जेवण कार्ब आणि कॅलरीज यांनी समृद्ध असते. पण जेव्हा आपण अन्नासोबत फळे खातो तेव्हा कार्ब आणि कॅलरीजचे प्रमाण वाढतात. अशा परिस्थितीत अन्नातील कार्बचे प्रमाण कमी करून जेवणासोबत फळे खाऊ शकतात. अन्यथा, अन्न आणि फळे एकत्र खाणं टाळावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/YDT7tXH : डोकेदुखीवर आयुर्वेदिक उपचार, 'या' टिप्स नक्की वापरा

<a href="https://ift.tt/gV2dTns Loss : रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचं करा सेवन, पोट भरेल आणि वजनही कमी होईल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : फळांवर मीठ किंवा साखर टाकून खाताय? तर सावधान! होईल नुकसानhttps://ift.tt/bLH0mJ2

0 Response to "Health Tips : फळांवर मीठ किंवा साखर टाकून खाताय? तर सावधान! होईल नुकसान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel