Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२, ऑक्टोबर १२, २०२२ WIB
Last Updated 2022-10-12T04:48:11Z
careerLifeStyleResults

Mumbai Local News : लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बातमी! पश्चिम रेल्वे लोकलमध्ये डबे वाढवले, आणखी 25 जागा निश्चित

Advertisement

Mumbai Local News : मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने (Western Railway) आपल्या सर्व नॉन-एसी नियमित लोकल ट्रेनमध्ये अतिरिक्त महिला कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे जनरल कंपार्टमेंट अपग्रेड केले जाईल. सध्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला वर्गासाठी आणखी 25 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. 8 ऑक्टोबर 2022 पासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे.

महिला प्रवाशांची मागणी

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले, “महिला प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आम्ही एकूण एक अतिरिक्त महिला कोचची तरतूद केली आहे. याशिवाय या डब्यात एका महिला द्वितीय श्रेणीच्या आणखी 25 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. हा कोच सध्याच्या लेडीज कोचला लागून आहे, ते म्हणाले की ही सुविधा 8 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने उपनगरीय लोकल गाड्यांच्या द्वितीय श्रेणीतील महिलांसाठी 25 अतिरिक्त आसनांची तरतूद केली आहे. चर्चगेटच्या टोकापासून 11 व्या कोचमध्ये आणि विरारच्या टोकापर्यंत द्वितीय श्रेणातील कोचमध्ये सध्याच्या डब्याव्यतिरिक्त अतिरिक्त कोचची तरतूद करण्यात आली आहे.

महिला प्रवाशांची संख्या वाढली
उपलब्ध आकडेवारीनुसार, पश्चिम रेल्वेवर महिला तिकीटधारकांची टक्केवारी 24.38% वरून 24.64% झाली आहे. 2019 मध्ये, पश्चिम रेल्वेने बदलत्या काळाच्या अनुषंगाने आपले महिला डबे अपडेट केले. तेव्हा पश्चिम रेल्वेने महिला डब्यांना लक्षात घेऊन त्यांचे आधुनिकीकरण केले होते.

जागेवरून महिलांमध्ये भांडण
लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या जागा वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. त्याचवेळी, या महिन्याच्या सुरुवातीला लोकल ट्रेनमध्ये सीटवरून काही महिला एकमेकांशी भिडल्या. त्यांच्यातील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले होते. ठाणे-पनवेल मुंबई लोकलच्या महिला कोटमध्ये ही घटना घडली.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mumbai Local News : लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बातमी! पश्चिम रेल्वे लोकलमध्ये डबे वाढवले, आणखी 25 जागा निश्चितhttps://ift.tt/wV9T2qW