Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२, नोव्हेंबर १५, २०२२ WIB
Last Updated 2022-11-15T03:48:01Z
careerLifeStyleResults

Health News : सावधान! पॅकेजमधील अन्नपदार्थांमुळे वाढतोय मृत्यूचा धोका, संशोधनातून उघड

Advertisement

<a href="https://ift.tt/1sASXGu Processed Foods Effect : सध्या लोकांची जीवनशैली ( Lifestyle ) इतकी व्यस्त झाली आहे की, अनेकांना धावपळीत योग्य सकस आहार मिळणं कठीण झालं आहे. या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचा (UPF) म्हणजे पॅकबंद अन्नपदार्थांचा वापर झपाट्याने वाढला आहे. धावपळीच्या जीवनात अनेकांना योग्य आहार घेण्यासाठी वेळ नसतो. अशा परिस्थितीत बहुतेक लोक ताज्या आणि सकस खाद्यपदार्थांऐवजी पॅकेज्ड फूडचं सेवन करतात. या पॅकबंद अन्नपदार्थांमुळे कोणतीही अधिक मेहनत न घेता तुमचं पोट तर भरतं, पण याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो हे अनेकांना माहित नसेल. अलिकडेच एक अभ्यासात समोर आलं आहे की, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजेच पॅकेज्ड फूडच्या सेवनामुळे मृत्यूचा धोका वाढतोय.

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमध्ये साखरेचं प्रमाण अधिक

संशोधनानुसार, हॉट डॉग, चिप्स, सोडा आणि आइस्क्रीम यांसारख्या पॅकेज्ड खाद्यपदार्थ ताजे नसतात, पॅकेज्ड फूड जास्त काळ टिकावं यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. यामुळे पॅकबंद खाद्यपदार्थामधील नैसर्गिक घटक कमी होतात. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. या पदार्थांचे सतत सेवन केल्याने लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह याशिवाय इतरही गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो.

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांमुळे आरोग्याचं नुकसान

अभ्यासानुसार, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ जसे की ब्रेड, शीतपेये, चिप्स आणि आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांच्या अधिक सेवनामुळे तुमचं आयुष्य कमी होऊन अकाली मृत्यू होण्याचा धोका वाढत आहे. अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांच्या सेवनामुळे 2019 साली ब्राझीलमध्ये 57,000 अकाली मृत्यू झाले आहेत. संशोधकांनी सांगितलं की, अनेक देशांमध्ये प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ हळूहळू ताजे, सकस आणि पारंपारिक खाद्यपदार्थांची जागा घेत आहेत. यामुळे आरोग्याचं नुकसान होत आहे.

पॅकेज्ड फूडचा शरीरावर वाईट परिणाम

सुपरमार्केटमध्ये पॅकेज्ड फूड सहज उपलब्ध असते. बहुतेक वेळा व्यस्त जीवनशैलीमध्ये अनेकांची तारांबळ उडते. या धावपळीच्या जीवनाच लोक झटपट पोट भरण्यासाठी पॅकेज्ड फूडचा पर्याय निवडतात. याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे पदार्थ अनेक प्रक्रिया करून बनवले जातात. त्यामुळे त्याचा शरीरावर फार वाईट परिणाम होतो. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊन मृत्यूचा धोका वाढतो.

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजे काय?

जे खाद्यपदार्थ अनेक प्रक्रिया करून बनवले जातात त्यांना अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड असं म्हणतात. सॉफ्ट ड्रिंक्स, चिप्स, चॉकलेट, आईस्क्रीम,चिकन नगेट्स, हॉटडॉग्स, फ्राईज यांसारखे पॅकेज फूड अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे त्यातील नैसर्गिक पोषक तत्वे कमी होतात. तसेच या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health News : सावधान! पॅकेजमधील अन्नपदार्थांमुळे वाढतोय मृत्यूचा धोका, संशोधनातून उघडhttps://ift.tt/HEkTe2M