Advertisement

Towel Cleaning : आंघोळीनंतर, चेहरा किंवा हात धुतल्यानंतर टॉवेलचा वापर केला जातो. बरेचदा लोक घरात, मित्रांबरोबर किंवा इतर ठिकाणी वापरलेले टॉवेल पुन्हा वापरतात. मात्र, असे टॉवेल वारंवार वापरल्याने हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तोच टॉवेल पुन्हा पुन्हा वापरल्याने त्यात जीवाणू तयार होतात. जे आरोग्याला नुकसान पोहोचवतात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, वापरलेल्या टॉवेलमध्ये लाखो धोकादायक बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. या संशोधनात नेमके काय म्हटले आहे ते जाणून घ्या.

बॅक्टेरियाद्वारे पसरणारा रोग

अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीच्या मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. चार्ल्स गर्बा यांच्या टीमने नुकतेच हे संशोधन पूर्ण केले असून, त्यांच्या अहवालानुसार बाथरूममध्ये वापरल्या जाणार्‍या टॉवेलपैकी सुमारे 14 टक्के टॉवेलमध्ये E.coli बॅक्टेरिया आढळतात. हे जीवाणू मानवाच्या पचनसंस्थेत असतात आणि विष्ठेद्वारे संपूर्ण शरीरात पसरतात.

बॅक्टेरियाचा वाढतो धोका

तुमचा टॉवेल अनेक दिवस धुतला नाही तर त्यामध्ये धोकादायक बॅक्टेरिया खूप वेगाने वाढू लागतात. त्या ठिकाणी ते त्यांचे जाळे तयार करतात. आणि यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते. तसेच, तुम्ही आजारी पडू शकतात. आणि तुम्हाला अनेक प्रकारचे गंभीर आजार सुरू होतात.

अशा प्रकारे टॉवेलचा वापर करा

डॉ. गर्बा यांच्या म्हणण्यानुसार 4-5 वेळा टॉवेल वापरल्यानंतर तो लगेच धुवायला टाका. आणि नंतर वापरा यामुळे बॅक्टेरियाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

धोके काय आहेत?

अस्वच्छ टॉवेल तुमचे अनेक प्रकारे नुकसान करू शकतात. चेहऱ्याच्या नॅपकिन्सवर किंवा टॉवेलवर तेल, मेकअप आणि मृत त्वचा (डेड स्कीन) जमा होते. येथेच बॅक्टेरिया वाढू लागतात आणि यामुळे तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की, त्वचेवर मुरुम येणं, त्वचा लाल होणं इ. तसेच, खडबडीत टॉवेल वापरल्याने त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

टॉवेल नसल्यास तुम्ही हे सुद्धा पर्याय निवडू शकता

जर तुमच्याकडे टॉवेल नसेल किंवा टॉवेल अस्वच्छ असेल किंवा फेस रूमालंच नसेल तर अशा वेळी तुम्ही सुती कपडा किंवा सुती ओढणीने तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला फेस वाईपही वापरता येऊ शकतात. मात्र, जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा पुरळ होण्याची शक्यता असेल तर ते वापरणे टाळा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/iz4h9qe Skin Care Tips : हिवाळ्यात सुंदर आणि नितळ त्वचा हवीय? 'हे' उपाय करून पाहा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : वापरलेला टॉवेल म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण; निरोगी आरोग्यासाठी 'या' गोष्टी आहेत धोकादायकhttps://ift.tt/a3hRKOF
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : वापरलेला टॉवेल म्हणजे अनेक रोगांना आमंत्रण; निरोगी आरोग्यासाठी 'या' गोष्टी आहेत धोकादायकhttps://ift.tt/a3hRKOF