Advertisement

Health Tips : मासिक पाळी (Menstrual Cycle) हा महिलांच्या शरीराशी संबंधित एक अविभाज्य भाग आहे. मासिक पाळीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. या दरम्यान शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. कधी तुमच्या त्वचेचे स्वरूप बदलते, तर कधी स्तनातील कोमलता तुम्हाला त्रास देते. याशिवाय पोटदुखी, पाठदुखी अशा अनेक समस्या जाणवू लागतात. पण तुमच्या कधी लक्षात आले आहे का की, पीरियड्स येताच त्वचेच्या समस्या दूर होऊ लागतात आणि त्यासोबतच त्वचेचा ग्लो सुद्धा वाढते. फक्त ग्लोच येतो असे नाही तर अनेक वेळ पिंपल्सचाही सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत हे सर्व का होते हे आपण जाणून घेणार आहोत.

त्वचेतील बदलांसाठी मासिक पाळीतील हार्मोन्स जबाबदार असतात

खरंतर मासिक पाळीतील हार्मोन्स त्वचेवर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये परिणाम करतात. यामुळेच कधी त्वचेवर पुरळ उठू लागते तर कधी त्वचेचा ग्लो वाढतो. पीरियड सायकलमध्ये त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. जसे महिन्यातील काही दिवस त्वचा अधिक तेलकट होते. तर, काही दिवसात ती अधिक कोरडी होते आणि काही दिवसात मुरुमांचा त्रास इतका वाढतो की चेहरा विचित्र दिसतो.

खरंतर, या काळात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते आणि इस्ट्रोजेनची पातळी कमी होते. त्यामुळे त्वचा खराब दिसू लागते. प्रोजेस्टेरॉनच्या वाढीमुळे तेल तयार होते. तुमच्या मासिक पाळीच्या आधीच्या आठवड्यात तुम्ही अनुभवत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे तुम्हाला काही मुरुम येऊ शकतात. पण एकदा का तुमची मासिक पाळी सुरू झाली की तुमची प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते, याचा अर्थ तुमची त्वचा क्लिन होण्यास सुरुवात होते.

चेहऱ्यावर ग्लो कसा येतो?

पीरियड सायकलच्या 21 व्या दिवशी शरीरातील इस्ट्रोजेन कमी होते आणि नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, त्वचा निस्तेज होणे इत्यादी गोष्टी वाढतात. पण पीरियड्स येताच शरीर पुन्हा एस्ट्रोजन तयार करते, ज्या वेळी तुमची मासिक पाळी सुरू असते, त्या वेळी शरीरातील इस्ट्रोजेनचे प्रमाण पुन्हा वाढू लागतेच. पण ते टेस्टोस्टेरॉनचे संतुलनही राखते. त्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र लहान दिसू लागतात.

मासिक पाळीच्या दरम्यान आणि नंतर तुमची त्वचा खूप ग्लो करते आणि सॉफ्ट होते. कारण तुमचे शरीर ओव्हुलेशनसाठी स्वतःला तयार करत असते. तज्ञांच्या मते, इस्ट्रोजेनचा सर्व प्रकारच्या पेशींवर शक्तिशाली प्रभाव पडतो जे संयोजी ऊतक घटक बनवतात. कोलेजन प्रमाणेच इलास्टिन आणि हायड्रॉलिक ऍसिड. मासिक पाळी दरम्यान, स्त्रीमध्ये इस्ट्रोजेन होत जाते आणि पुढील मूल्यांकनाचा परिणाम म्हणून, त्वचेवर ग्लो येतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/PXpfS6c Water : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? वाचा संशोधनात काय म्हटलंय

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : मासिक पाळीनंतर तुमच्याही चेहऱ्यावर ग्लो येतो? जाणून घ्या यामागचं कारणhttps://ift.tt/d4EZrq3
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : मासिक पाळीनंतर तुमच्याही चेहऱ्यावर ग्लो येतो? जाणून घ्या यामागचं कारणhttps://ift.tt/d4EZrq3