Viral Disease : कोरोनासोबतच डेंग्यूही बळावतोय! दोन्हीपैंकी कोणत्या विषाणूची लागण झाली आहे 'असं' ओळखा

Viral Disease : कोरोनासोबतच डेंग्यूही बळावतोय! दोन्हीपैंकी कोणत्या विषाणूची लागण झाली आहे 'असं' ओळखा

<a href="https://ift.tt/FWwhTB3 Treatment vs Dengue Treatment : कोरोना विषाणूच्या संसर्ग अद्याप कायम आहे. कोरोना विषाणूचे ( Coronavirus ) नवीनवीन व्हेरियंट ( Covid19 Variant ) समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता गुलाबी थंडीचा चाहूल ( Winter Season ) लागली असताना आता डेंग्यूसारखे ( Dengue ) विषाणूजन्य आजार ( Viral Disease )  बळावताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोना विषाणू अधिक धोकादायक बनत आहे, तर दुसरीकडे डेंग्यूसारखा व्हायरल आजार डोकं वर काढत आहेत. अशावेळी लोकांना डेंग्यूचू लागण झाली आहे की कोरोनाची हे समजणं कठीण जात आहे. त्यामुळे या दोन्ही रोगांची लक्षणं कशी ओळखायची जाणून घ्या.

अनेकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे की, रुग्णाला कोरोना झाला की डेंग्यू हे कसं ओळखावं? यासाठी रोगाची लक्षणं काय आहे ते पाहा.

डेंग्यू आणि कोरोना हे दोन्ही विषाणूजन्य ( Viral Disease ) आजार आहेत. ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे दोन्ही रोगांमध्ये सामान्य आहेत. मात्र यामध्ये काही फरक देखील आहे. हा फरक कसा ओळखायचास ते जाणून घ्या.

'ही' आहेत डेंग्यूची लक्षणे ( Dengue Symptoms )

अमेरिकन सीडीसीनुसार सतत उलट्या होणे, धाप लागणे, अशक्तपणा, थकवा, अस्वस्थता, यकृताचा आकार वाढणे, प्लेटलेटची संख्या वेगाने वाढणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणे ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत.

कोरोनाची लक्षणे काय आहेत? ( Coronavirus Symptoms )

कोरोनाची अनेक लक्षणे डेंग्यूपेक्षा वेगळी आहेत. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत सतत दुखणे, ओठ किंवा चेहरा निळा पडणे, घशात घरघर, भ्रम होणे, झोपे संबंधित समस्या ही प्रमुख लक्षणे आहेत. दरम्यान काळानुसार या लक्षणांमध्येही बदल होत आहे.

लक्षणे किती दिवसात दिसतात?

कोणत्याही रोगाची लक्षणे दिसण्याची वेळही ठरलेली असते. जसे की, टायफॉइडची लक्षणे दिसायला एक ते तीन आठवडे लागतात. डेंग्यूची लागण झाल्यास रुग्णाला 3 ते 10 दिवसांत लक्षणे दिसू लागतात. तर कोरोनाची लक्षणे दिसण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागतो.

कोरोना आणि डेंग्यूच्या उपचारांमध्ये काय फरक आहे? ( Difference Between Coronavirus and Dengue )

कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे वेगळी आहेत. त्याच्या उपचारातही फरक आहे. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होतात. अनेक रुग्णांना प्लेटलेट्स चढवण्याची गरज असते. प्लेटलेट्स वाढल्याने रुग्णाची प्रकृती सुधारू लागते. तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत झाल्यास कोरोनावर मात करता येते. डॉक्टरांचे औषधे, सकस आहार आणि काही मूलभूत पद्धतींची काळजी घेतल्यास कोरोनामुक्त होता येते व्यवस्थापन करता येते. डेंग्यूच्या उपचारात औषधांची आवश्यकता असते.

कोणत्या रोगाची लागण झाली आहे, हे तपासानंतरच कळेल

डेंग्यू किंना कोरोना कोणत्या रोगाची लागण झाली आहे, हे तपासातूनच स्पष्ट होईल. कोरोना आणि डेंग्यूच्या चाचणीमधून याबाबत स्पष्ट होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Viral Disease : कोरोनासोबतच डेंग्यूही बळावतोय! दोन्हीपैंकी कोणत्या विषाणूची लागण झाली आहे 'असं' ओळखाhttps://ift.tt/eifUR10

0 Response to "Viral Disease : कोरोनासोबतच डेंग्यूही बळावतोय! दोन्हीपैंकी कोणत्या विषाणूची लागण झाली आहे 'असं' ओळखा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel