Advertisement

Winter Health Tips : थंडीचे दिवस सुरु झाले आहे आणि अशातच प्रत्येक व्यक्तीला आपल्या लाईफस्टाईलकडे आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या आरोग्याकडे थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर यामुळे रोगांना आमंत्रण मिळू शकते. थंडीच्या दिवसांत आपली रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा इतर ऋतूंच्या मानाने कमी होते. थंडीच्या दिवसांत दररोज फिट राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे हे या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या

रोज व्यायाम करा : थंडीच्या दिवसांत शरीराल तंदुरूस्त ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. वयाच्या मानाने तुम्ही वेगवेगळे व्यायाम करू शकतात. व्यायाम केल्याने शरीरातील सर्व भागांमध्ये रक्ताभिसरण होते. आणि शरीरात ऊब निर्माण होते.

ध्येय निश्चित करणे गरचेचे आहे

जर तुम्हाला तुमच्या व्यायामाबद्दल संभ्रम वाटत असेल तर तुम्ही यासाठी पर्सनल ट्रेनर, व्यायाम मानसशास्त्रज्ञ किंवा इतर कोणत्याही आरोग्य तज्ञाचा सल्ला घेऊ शकता. प्रत्येक दिवसाचे ध्येय ठरवून त्यावर काम करावे.

एक पार्टनर शोधा

अनेकदा एकट्याला व्यायाम करायला काही लोकांना कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही तुमच्याबरोबर एक फिटनेस पार्टनर ठेवा. म्हणजेच तुम्हाला मोटीव्हेशनही मिळेल आणि तुम्हाला व्यायाम करताना कंटाळाही येणार नाही.

वॉर्म अप आणि स्ट्रेचिंग करा

हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त आणि ऊबदार ठेवण्यासाठी वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे. यामुळे शरीरात उष्णता तर राहतेच, शिवाय इतर व्यायाम करणेही सोपे जाते. स्ट्रेचिंग करण्यासाठी, हात आणि पाय हलवा, मानेची हालचाल करा आणि खांदे गोल फिरवा. थंडीच्या वातावरणात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी लाइट वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग करू शकता. वॉर्म-अपमध्ये तुम्ही पायांची हालचाल करू शकता.

वेगवान चाला

हिवाळ्यात ब्रिस्क वॉकिंग केल्याने आपल्या गुडघ्यांवर कमी दबाव येतो आणि शरीराच्या खालच्या भागाचे स्नायू चांगले काम करतात. मॉर्निंग वॉकमुळे हाडांची घनता वाढते. यासोबतच त्याचा मानसिक क्षमतेवरही चांगला परिणाम होतो. प्रत्येक व्यक्तीने हिवाळ्यात किमान तीन किलोमीटर चालणे गरजेचे आहे.

आहाराची काळजी घ्या

हिवाळ्यात आपण आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. विशेषतः थंड प्रभाव असलेल्या गोष्टींपासून अंतर ठेवावे आणि गरम पदार्थांचे सेवन करावे.

त्वचेची काळजी घ्या

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू लागते. कारण हिवाळ्यात हवा कोरडी असते, त्यामुळे आपली त्वचा कोरडी होते. म्हणूनच तुमच्या त्वचेला वेळोवेळी मॉइश्चरायझ करत राहा.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/BMZ9b5w Pollution Effect On Eyes : वायुप्रदूषणाचा डोळ्यांवर परिणाम होतोय? प्रदूषणामुळे डोळ्यांतील जळजळ दूर करण्यासाठी 'या' टीप्स वापरा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Winter Health Tips : हिवाळ्यात आजारी पडण्याची भिती वाटतेय? 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, निरोगी आणि फिट राहालhttps://ift.tt/S4MYJXV
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Winter Health Tips : हिवाळ्यात आजारी पडण्याची भिती वाटतेय? 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, निरोगी आणि फिट राहालhttps://ift.tt/S4MYJXV