World Diabetes Day 2022 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो? वाचा यामागचं महत्त्व

World Diabetes Day 2022 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो? वाचा यामागचं महत्त्व

World Diabetes Day 2022 : दरवर्षी 'जागतिक मधुमेह दिन 2022' (World Diabetes Day 2022) हा सर फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या जन्म तारखेला 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. चार्ल्स हर्बर्ट यांच्यासमवेत सर फ्रेडरिक बॅंटिंग यांनी इन्सुलिन हा हार्मोन शोधला. तज्ज्ञांच्या मते, आज सुमारे 463 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. या मधुमेही रुग्णांपैकी 90% रुग्णांना टाईप-2 मधुमेह आहे. आरोग्य व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, मधुमेहाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांमुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून लोक प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करू शकतील. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.

सध्या मधुमेह ही मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून तरूण आणि वृद्धांपर्यंत ते आपल्या सर्वांनाच मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. त्याची दहशत जगभर पसरत आहे. एकदा मधुमेह झाला की तो मुळापासून नष्ट करणे कठीण असते. त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराने त्रस्त असताना रक्तदाब कमी होणे, मेंदूवर होणारा परिणाम, हृदयाला धोका, जखमा झाल्यानंतर बरी होण्यास वेळ, किडनी पसरणे, दृष्टी कमी होणे अशा अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

जागतिक मधुमेह दिन 2022 ची थीम :

या वर्षीच्या जागतिक मधुमेह दिनाची थीम आहे मधुमेहाचा शिक्षणात प्रवेश. मधुमेह हा एक प्रकारचा चयापचय विकार आहे. या आजाराविषयी जागरूकता शिक्षणाच्या माध्यमातून पसरविता येते. त्यामुळे आहारात काही बदल करून आणि नियमित व्यायाम करून व्यक्ती स्वत:ला या आजाराच्या धोक्यातून बाहेर काढू शकते.

आंतरराष्ट्रीय मधुमेह प्रतिष्ठानने या दिवशी जागतिक मधुमेह दिनाचा इतिहास ठरवला. 1991 पासून, हा दिवस UN द्वारे जागतिक दिवस म्हणून ओळखला गेला आणि सर्वांना समजू लागले की हा एक अतिशय गंभीर आजार आहे.

जागतिक मधुमेह दिनाचे महत्त्व (World Diabetes Day Importance) :

मधुमेह दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या आजाराबद्दल समाजात जागरूकता पसरविणे. जेणेकरून प्रत्येकाला त्याची लक्षणे आणि उपचार केव्हा सुरू करावे हे कळू शकेल. यावेळी मधुमेहाशी लढण्यासाठी लोकांकडे आरोग्य सुविधा आहेत का, याचीही माहिती दिली जाते.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/r1IOKiG in Women : मधुमेहामुळे महिलांना 'या' समस्या जाणवतात; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: World Diabetes Day 2022 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो? वाचा यामागचं महत्त्वhttps://ift.tt/6yXzjMT

0 Response to "World Diabetes Day 2022 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो? वाचा यामागचं महत्त्व"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel