TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
Health Tips : गरोदरपणात खोकल्याचा जास्त त्रास होतोय? 'या' घरगुती उपायांचा वापर करा, लवकर फरक जाणवेल
Health Tips : कोरडा खोकला ही एक सामान्य समस्या आहे, जी काही दिवसात बरी होते. परंतु, जर ही समस्या गरोदर महिलांना होत असेल तर मात्र ही समस्या गंभीर आहे. कारण गरोदर महिलांची रोगप्रतिकारशक्ती आधीच कमकुवत असते. जसजसा काळ पुढे सरकतो. गरोदरपणात उठणे-बसणे त्रासदायक होते. कोरड्या खोकल्याचा त्रास असेल तर श्वास घेण्यास त्रास, पोटात दुखणे, ताप येणे असे त्रास होतात. जेव्हा खोकला येतो तेव्हा पोटावर दाब पडतो, त्यामुळे पोटात असलेल्या बाळालाही त्रास होतो. जास्त औषधे खाणे देखील योग्य नाही. अशावेळी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतात.
मधाचे सेवन करा : मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. कोरड्या खोकल्याचा उपचार मधासह शक्य आहे. गर्भवती महिलांना कोरडा खोकला असल्यास मधाचे सेवन करावे, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्ग टाळण्यासही मदत होते. अनेक अभ्यासांमध्ये असेही आढळून आले आहे की, खोकल्यात औषधांपेक्षा मध जास्त फायदे देते.
आलं वापरा : आलं हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्यामुळे कोरड्या खोकल्याची समस्या दूर होऊ शकते. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. याच्या सेवनाने खोकला आणि घसा दुखण्यात खूप आराम मिळतो. गरोदरपणात कोरडा खोकला झाल्यास आलं पाण्यात उकळून प्यावे, याशिवाय आलं बारीक करून त्यात चिमूटभर मीठ मिसळून तोंडात ठेवावे, त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे लवकरच खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
लसूण वापरा : कोरड्या खोकल्यासाठी लसूण खूप फायदेशीर मानले गेले आहे. लसूणमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबैक्टीरियल, अँटीव्हायरल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात, त्यामुळे घशाच्या दुखण्यापासून लवकर आराम मिळतो. अशावेळी लसणाच्या दोन कळ्या ठेचून त्यामध्ये मध मिसळून खा, असे दिवसातून दोन ते तीन वेळा करा, कोरड्या खोकल्यापासून लवकर आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/Ef1NSIv Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : गरोदरपणात खोकल्याचा जास्त त्रास होतोय? 'या' घरगुती उपायांचा वापर करा, लवकर फरक जाणवेलhttps://ift.tt/zLljvoh
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या