Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२, डिसेंबर २९, २०२२ WIB
Last Updated 2022-12-29T00:48:11Z
careerLifeStyleResults

Health Tips : चिमूटभर हिंग अनेक आजारांवर फायदेशीर; 'अशा' प्रकारे वापर करा मिळतील अनेक फायदे

Advertisement

Health Tips : हिंग हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे ज्याशिवाय स्वयंपाकघर अपूर्ण आहे. सामान्यतः याचा वापर डाळी आणि भाज्यांमध्ये त्यांची चव वाढविण्यासाठी केला जातो. यामुळे जेवणाला अप्रतिम चव आणि सुगंध येतो. चवीबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनेही हिंग तितकेच फायदेशीर आहे. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर सर्वात आधी घरगुती उपायांमध्ये हिंगाचेच नाव घेतले जाते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते, परंतु तुम्हाला माहित आहे का की पचनक्रिया व्यतिरिक्त हिंग तापाच्या समस्येपासून देखील आराम मिळवून देते.

तापामध्ये हिंग किती फायदेशीर आहे

हिंगामध्ये अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे आरोग्यावर खूप सकारात्मक प्रभाव टाकतात. यामुळेच ताप कमी करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते. हिंगाची पट्टी लावल्याने ताप कमी होतो. हिंगाची पट्टी बनवण्यासाठी पातळ कापड घ्या. एका चमच्यात थोडे पाणी घेऊन त्यात चिमूटभर हिंग टाका आणि चांगले मिक्स करा. या हिंगाच्या पाण्यात तुमचे कापड भिजवा आणि ही पट्टी मुलाच्या डोक्यावर लावा आणि काही वेळ असेच राहू द्या. मुलाचा ताप हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. हिंगाने पायाच्या तळव्याला मसाज केल्याने मुलाच्या शरीराचे तापमान देखील कमी होते. मात्र, तरीही मुलाचा ताप कमी येत नसेल तर, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हिंगामुळे 'या' समस्यांमध्येही आराम मिळतो.

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी होणे ही सामान्य गोष्ट आहे. थंडीत श्वास घेण्यास आणि बोलण्यात त्रास होतो. अशा वेळी हिंगाचे पाणी छातीवर आणि घशावर लावल्याने आराम मिळतो. हिंगाच्या पाण्याचा वास घेतल्यानेही सर्दी लवकर निघून जाते.

ज्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या आहेत त्यांनी हिंगाचा वापर करावा. हिंगामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, त्यामुळे दमा आणि ब्राँकायटिस असलेल्यांना त्याचा फायदा होतो.

रक्तदाब आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याच्या समस्येवरही हिंगाचा वापर केला जातो. हिंग हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे म्हणून ओळखले जाते.

दिवसभराची धावपळ आणि थकवा यामुळे डोकेदुखी होत असल्यास हिंग खूप फायदेशीर आहे, तुम्ही हिंग एका ग्लास पाण्यात मिसळून थंड करून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. यामुळे वेदना दूर होतील आणि मायग्रेनच्या दुखण्यावरही हे गुणकारी आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/2lYILKw Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : चिमूटभर हिंग अनेक आजारांवर फायदेशीर; 'अशा' प्रकारे वापर करा मिळतील अनेक फायदेhttps://ift.tt/zAre0Bb