Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १ डिसेंबर, २०२२, डिसेंबर ०१, २०२२ WIB
Last Updated 2022-12-01T01:48:48Z
careerLifeStyleResults

Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते? यावर उपाय काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Advertisement

Winter Skin Care Tips : हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. हळूहळू वातावरणात गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. या दरम्यान अनेकांना असं वाटतं की उन्हाळ्यात त्वचेचा जो तजेलपणा असतो तो थंडीत काहीसा गायब होतो. त्वचेचा हा तजेलपणा थंडीतही कसा टिकवून ठेवायचा? त्याचबरोबर हिवाळ्यात अनेक त्वचा विकार होतात जसे की, सोर्यासिस, एक्झिमा (इसब) यांसारख्या आजारांवर मात कशी करायची? त्वचेवर होणाऱ्या एलर्जीला कसे सामोरे जायचे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या आपल्या 'डॉक्टर टिप्स' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

हिवाळ्यात जाणवणाऱ्या कोरड्या त्वचेबाबत, तसेच एलर्जीबाबत सांगताना डॉ. सिद्धी चिखलकर (Dr. Siddhi Chikhalkar), त्वचा रोग विभाग (सहयोगी प्राध्यापिका, KEM) म्हणतात की, थंडीमुळे आपल्या त्वचेवर एक तेलाचा थर असतो. आपल्या शरीरात तेलाच्या काही ग्रंथी असतात. त्यातून कमी प्रमाणात तेल बाहेर निघतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळे 'सोर्यासिस' आजार खूप प्रमाणात वाढतो.

सोर्यासिस आजाराची लक्षणं काय?

सोर्यासिसमध्ये त्वचेवर लाल रंगाचे चट्टे पडतात. आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे पापुद्रे जमा होतात. हे पापुद्रे दर्शनी भागावर जास्त दिसतात. जसे की, हातावर, पायांवर, चेहऱ्यावर आणि बऱ्याच वेळेला डोक्यावर असे आजार उद्भवतात.

अॅटोपिक एक्झिमा (इसब)

बऱ्याचदा सर्दी, दमा, हे एलर्जीचे त्रास अनेकांना माहित आहेत. पण त्वचेचीसुद्धा दम्याच्या स्वरूपात काही एलर्जी असते. त्याला 'एटॉपिक एक्झिमा' म्हणतात. हे प्रमाण शक्यतो लहान मुलांमध्ये पाहायला मिळते. ज्यांची त्वचा फारच सेन्सिटिव्ह असते. त्यांची त्वचा अतिशय लाल होते. बारीक पाणी भरणाऱ्या पुटकुळ्या येतात आणि तीव्र प्रमाणाची खाज येते. बऱ्याच वेळा असे त्वचा विकार असताना अनेकदा आपल्याला थंडीत कडुनिंबाच्या पाण्याने अंघोळ करायला, जोरात साबण लावून घासणे, कडकडीत पाण्याने अंघोळ करणे आपल्याला फार आवडते. पण या सगळ्या गोष्टी अगदी त्वचेच्या विरूद्ध जाऊन आपण करतो. आणि अशा आजारांना आपण जास्त फोफवायला मदत करतो.

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?

अति गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा : हिवाळ्यात कडकडीत पाण्याने अंघोळ करणे टाळलं पाहिजे. यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊन त्यातील तेलकटपणा निघून जातो. आणि त्वचा कोरडी होऊन खाज सुटते.

मॉईश्चरयुक्त साबण निवडावा : हिवाळ्यात आपण जो साबण निवडू तो मॉईश्चरयुक्त असायला पाहिजे. साबणाच्या दिसण्यावरून किंवा वासावरून तो वापरू नये. पूर्वीच्या काळी लोक नारळाचं दूध काढून अंगाला लावायचे यामुळे त्वचेला खूप फायदा व्हायचा. अशा काही  घरगुती टिप्स तुम्ही वापरू शकतात. ज्या त्वचेला हानिकारक नसतात.

भरपूर प्रमाणात पाणी पिणे : थंडीत फार तहान लागत नाही. मात्र, त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी पाण्याचा भरपूर वापर केला पाहिजे. कमीत कमी 3 ते 5 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.

ओल्या त्वचेवर मॉईश्चरायझरचा वापर करणे टाळा : मॉईश्चरायझर लावताना कधीही ओल्या त्वचेवर लावू नये. कोरड्या त्वचेवर मॉईश्चरायझर लावल्याने त्याची जी शोषणता आहे ती चार पटींनी वाढते. रात्री झोपताना मॉईश्चरायझर लावून झोपल्यास अनेक फायदे मिळतात.  त्याचबरोबर त्वचेवर नियमित लिप बाम लावावा. मध आणि साजूक तूप जरी ओठांना लावलं तरी त्याचा खूप छान परिणाम दिसतो.

कोरडी त्वचेच्या समस्येवर तज्ज्ञांचं मत काय?

बऱ्याचदा सनस्क्रिन फक्त उन्हाळ्यात लावलं जातं. मात्र 12 महिने सनस्क्रिनचा वापर करावा. थंडीत सनस्क्रिनचा जास्त वापर करावा.

थंडीत सुती आणि सैल कपडे वापरणं आवश्यक आहे.

पाण्याबरोबरच फॅसिडयुक्त आहारावर जसे की, फिश, बदाम, अक्रोड, 1 चमचा साजूक तूप खाऊन तुम्ही तुमची त्वचा तजेलदार ठेवू शकता.

पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/ycSLH72 Care Tips : सनस्क्रीन आणि सनब्लॉक यामध्ये तुमचासुद्धा गोंधळ होतो? दोघांमध्ये नेमका फरक काय? वाचा सविस्तर

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते? यावर उपाय काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्लाhttps://ift.tt/wtKO3Lv