Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १८ जानेवारी, २०२३, जानेवारी १८, २०२३ WIB
Last Updated 2023-01-18T04:48:40Z
careerLifeStyleResults

Health News : हृदयविकाराच्या झटक्यानंतर 'गोल्डन अवर' महत्त्वाचा, गोल्डन अवरमध्ये प्रथमोपचार कसे कराल?

Advertisement

<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/H5cMoyt News : हार्ट अटॅक (<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/qgSLbPX Attack) आल्यानंतरच्या पहिला तासाला डॉक्टर 'गोल्डन अवर' (<a href="https://ift.tt/OqUkmeK Hour) म्हणतात. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तसेच तो बरा होण्याकरता हा एक तास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या एका तासात वेळीच आणि योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाला जीव गमवावा लागत नाही. पहिल्या एका तासात रुग्णांवर योग्य उपचार झाले नाहीत तर, जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्यामुळे, लक्षणं दिसू लागताच त्वरीत रुग्णालयाकडे धाव घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

हार्ट अटॅकनंतर हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो तसेच हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने हृदयाचे स्नायू 80-90 मिनिटांनी हळूहळू मृत पावण्यास सुरुवात होते. स्नायू कमकुवत होण्यास सुरुवात होते. उपचारासाठी उशीर झाला तर हृदयाचे ठोसे अनियमित होतात. मात्र हे या 'गोल्डन अवर'मध्ये योग्य उपचारांनी सुरळीत करता येऊ शकतो.

लक्षणे कोणती?

छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना, हात, जबडा, मान, पाठ आणि ओटीपोटात दुखणे, घाम येणे, चक्कर येणे किंवा चिंताग्रस्त होणे, दम लागणे, मळमळणे आणि खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा येणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

गोल्डन अवरमध्ये प्रथमोपचार कसे कराल?

छातीत दुखू लागल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ घालवू नये. अशावेळी वेळ अतिशय महत्त्वाचा असून एक मिनिटे जरी लावला तरी रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.

तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचून ईसीजी काढून घ्यावा.

छातीत दुखण्याला अॅसिडीटी समजून घरच्या-घरी उपचार करु नयेत.

जर रुग्ण बेशुद्ध पडला असेल तर ताबडतोब त्याला सपाट ठिकाणी झोपवा. नंतर त्याच्या नाकाजवळ बोटांनी किंवा कानांनी त्याचा श्वास तपासा. शिवाय नाडी देखील तपासा.

आपला डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्याच्यावर ठेवा आणि बोटांनी लॉक करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि आपल्या सर्व ताकदीनिशी रुग्णाची छाती दाबा अशा पद्धतीने सीपीआर द्या.

दर मिनिटाला 120 कॉम्प्रेशन्स द्याव्या लागतील, ही क्रिया रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत करावी लागेल.

अॅस्पिरीन 300 mg किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या देऊ शकता. रुग्ण शुद्धीवर असल्यास सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवू शकता.

ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे त्या व्यक्तीने अनावश्यक हालचाल करु नये. स्वतः पायी दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करु नये. जिने चढणे आणि उतरणे करु नये. स्वतः गाडी चालवू नये.

- डॉ राहुल ठंकी, इमर्जन्सी मेडिसिन एक्स्पर्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नाशिक

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health News : हृदयविकाराच्या झटक्यानंतर 'गोल्डन अवर' महत्त्वाचा, गोल्डन अवरमध्ये प्रथमोपचार कसे कराल?https://ift.tt/rdK9GeL