Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १७ जानेवारी, २०२३, जानेवारी १७, २०२३ WIB
Last Updated 2023-01-17T01:48:41Z
careerLifeStyleResults

Health Tips : सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? आजारी पडू नये यासाठी 'हे' आरोग्यदायी अन्न रोज खा

Advertisement

Health Tips : सर्दी आणि खोकला हे अनेक व्हायरल इन्फेक्शन्सचे एक सामान्य लक्षण आहे, जे सामान्यतः दिसून येते. फ्लू असो वा कोविड, आरएसव्ही (रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस) किंवा इतर कोणताही संसर्ग, ही लक्षणे बहुतेक व्हायरल इन्फेक्शनमध्ये दिसतात. हिवाळ्याच्या दिवसात, लोक बहुतेक व्हायरल इन्फेक्शनने आजारी असतात. जर तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असाल आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत असेल, तर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवणे आणि मजबूत करणे आवश्यक आहे.

हिवाळा म्हणजे आजारांचा ऋतू. हा ऋतू अनेक आजार घेऊन येतो. थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, हिरव्या पालेभाज्यांसह. मोहरी आणि पालक, आवळा आणि संत्री यासारखी हंगामी फळे खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि संसर्गाच्या प्रभावापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. हिवाळ्यात खोकला आणि सर्दी यांसारख्या विषाणूजन्य संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही तुमच्या दिनक्रमात कोणते पदार्थ समाविष्ट करू शकता ते जाणून घ्या.

'या' पदार्थांचा समावेश करा

1. लसूण : लसूणमध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आणि ऍलिसिन नावाचे संयुग असते, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करते.

2. हळदीचे दूध : हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीने या दुधाचे सेवन केल्यास हा त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत होऊ शकते. झटपट उपाय दिसण्यासाठी तुम्ही दुधात काळी मिरी देखील घालू शकता.

3. तुळशी : तुळशी संसर्गाशी लढण्याचे आणि त्यांना दूर ठेवण्याचे काम करते. हे नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती बूस्टर म्हणून काम करते.

4. बदाम : बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. बदामामध्ये झिंक देखील असते. झिंक हे असे खनिज आहे, जे सर्दी आणि खोकल्यामध्ये खूप फायदेशीर ठरते.

5. आवळा : या हंगामी फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आवळा हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म म्हणून ओळखला जातो. मॅक्रोफेजेस आणि रोगप्रतिकारक प्रणालीच्या इतर पेशी नियमितपणे व्हिटॅमिन सी घेतल्याने चांगले कार्य करतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/L1SOw3k Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? आजारी पडू नये यासाठी 'हे' आरोग्यदायी अन्न रोज खाhttps://ift.tt/ImB43Ff