Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १२ जानेवारी, २०२३, जानेवारी १२, २०२३ WIB
Last Updated 2023-01-12T00:49:06Z
careerLifeStyleResults

Yoga For Hair : जास्त केस गळतात? केस घनदाट होण्यासाठी 'हे' आसन ट्राय करा

Advertisement

Yoga For Hair : केस गळणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात केसगळतीचा त्रास अनेकांना होतो. याला कारण म्हणजे आपली जीवनशैली, आपले आजार आणि हिवाळ्यात वाढणारा कोंडा. या व्यतिरिक्त, कोविड-19 महामारीमुळे सध्याच्या काळात सर्व वयोगटातील लोकांमध्ये केस गळण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोविड नंतरच्या काळात अनेकांना केसगळतीची समस्या सुरु झाली. तुमचे केस घनदाट दिसावेत यासाठी व्हिटॅमिन ए, प्रथिने, जस्त, लोह आणि व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा समावेश असावा.

जास्त केस गळतात?

केसगळतीच्या समस्येत तुमच्या जीवनशैलीत काही बदल केल्यानेही तुम्हाला निरोगी वाटू शकते. योग हे एक शक्तिशाली साधन आहे ज्याचे केसांच्या आरोग्यासह अनेक फायदे आहेत. या ठिकाणी काही योगासने आहेत जी केसगळती कमी करण्यास आणि निरोगी केस मिळविण्यात मदत करू शकतात.

वज्रासन

ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांना वज्रासन करण्याची शिफारस केली जाते. या आसनाच्या सरावाने गॅस्ट्रिक समस्या आणि इतर पचन विकार देखील दूर झाले आहेत. हे केसांच्या वाढीस मोठ्या प्रमाणात चालना देण्यास मदत करते. जेवणानंतर पाच ते दहा मिनिटे या आसनात बसल्याने पचन सुधारते, ज्यामुळे केसांच्या आरोग्यास हळूहळू मदत होते.

अधोमुख श्वान आसन

एकूण आरोग्यासाठी बारा आसन सूर्यनमस्कार हे सर्वोत्तम योग आसनांपैकी एक मानले जाते. अधोमुख श्वान आसन हे डोक्यातील रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनचे परिसंचरण सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे जे केसांच्या वाढीस मदत करू शकते. या आसनाचा दररोज काही काळ सराव केल्यास केसगळती बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

शीर्षासन

शिर्षासन हे आसन करणं तसं कठीण आहे. मात्र, या आसनामुळे हे टाळूमध्ये रक्तप्रवाह सुरळीच चालू ठेवण्यास मदत होते. शिर्षासनामुळे केस गळणेही कमी होते, ज्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते.

मत्स्यासन

या आसनाला 'फिश पोझ' म्हणूनही ओळखले जाते. हे आसन ज्यांना लांब, मजबूत आणि चमकदार केस हवी आहेत त्यांच्यासाठी आवश्यक आहे. फिश पोझमध्ये डोके मागे खेचणे समाविष्ट असते ज्यामुळे पुन्हा रक्त प्रवाह आणि टाळूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. या आसनाचा दररोज सराव केल्याने तुम्ही केवळ केसगळतीच नाही तर केसांच्या बहुतांश समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Mne1H7N Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Yoga For Hair : जास्त केस गळतात? केस घनदाट होण्यासाठी 'हे' आसन ट्राय कराhttps://ift.tt/rHAW9CJ