Heartbreak Pain: तुम्ही अनेक वर्ष जोडीदारासोबत एकत्र असलेल्या नात्यामधून (Relationship Tips)  अचानक बाहेर पडला असाल आणि तुम्हाला एकटं वाटत असेल, तर ते अगदीच साहजिक आहे. एखाद्या नात्यातून बाहेर पडणं ही खूपच वेदानादायी गोष्ट आहे. पण ब्रेकअपचा (Breakup Side Effects) ताण घेण्याची गरज नाही, कारण ब्रेकअपचा आपल्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर (Health Issue) परिणाम होतो. आणि असेच चालू राहिले तर आपल्याला अनेक आजार देखील होऊ शकतात, असा अहवाल एका संशोधनातून समोर आला आहे.

ब्रेकअप होणं ही खूपच वेदनादायी गोष्ट आहे. ब्रेकअपमधून बाहेर पडणे प्रत्येकासाठी सोपे नसते. रिसर्चनुसार, ब्रेकअपचा परिणाम हा फक्त तुमच्या डोक्यावर होत नाही तर तुमच्या संपूर्ण शरिरावर होतो. इंग्लंडची प्रसिद्ध डॉक्टर डेबोराह ली यांच्या मते, जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता, तेव्हा तुमच्या शरिरातील हार्मोन्स वेगाने वाढत असतात. कारण त्यावेळी तुम्ही प्रेमात असतात आनंदी असता. जेव्हा तुमचे ब्रेकअप होते. नात्यात धोका मिळालेला असतो, यावेळी मात्र तुमच्या शरीरातील चांगल्या हॉर्मोन्सचे प्रमाण वेगाने कमी होते. तर तणाव वाढल्यामुळे शरीरात कॉर्टीसोल सारख्या हॉर्मोनसचे प्रमाण वेगाने वाढते. त्यामुळे व्यक्तीमध्ये राग, चिडचिडपणा, अस्वस्थता जाणवते.

शरीरात कॉर्टीसोल हार्मोनचे प्रमााण वाढल्याने ब्लड प्रेशर (Blood Pressure) वाढतो. अनेक शारीरिक समस्या वाढतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, ब्रेकअप हा सामाजिक तिरस्कार मानला जातो. ज्याचा परिणाम डोक्यावर होतो. ज्यामुळे डोकेदुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. याकाळात वेळेवर जेवण घेत नाही किंवा ते टाळले जाते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

संशोधनादरम्यान, ज्या व्यक्तीचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे, अशा व्यक्तीचा MRI केला. MRI दरम्यान जेव्हा त्याच्या एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा फोटो दाखवला तर त्यांच्या डोक्यातील असा भाग अॅक्टिव्ह होतो, जो भाग आपल्याला काही लागल्यानंतर अॅक्टिव्ह होतो. त्यामुळे जेव्हा ब्रेकअप होते त्यावेळी आपल्याला जेव्हा पडल्यावर मार लागतो, तेवढाच त्रास होतो. जेव्हा तुमचे खरे प्रेम तुमचा वाईट पद्धतीने विश्वासघात करते आणि तुमच्याशी सर्व संबंध तोडते, तेव्हा खूप वेदना होतात.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या व्यक्तींचं अचानक ब्रेकअप होतं आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं. ब्रेकअपचा परिणाम तुमच्या मनासोबतच तुमच्या शरीराला देखील होतो. त्यामुळे खचून न जाता आत्मविश्वासाने पुन्हा नवी सुरूवात करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. सर्व गोष्टी संशोधनातून समोर आलेल्या आहेत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

ब्रेकअपचे संकेत तीन महिन्यांपूर्वीच मिळणार; शास्त्रज्ञांनी शोधलाय मार्ग

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Breakup झालंय? ताण घेऊ नका, नाहीतर आरोग्यावर होईल वाईट परिणामhttps://ift.tt/iWvCLPA
0 टिप्पण्या