TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Health News : स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि उपचार

<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/dwvgYkU News : स्तन, फुफ्फुस, मौखिक आणि आतड्यांप्रमाणेच स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे (Pancreatic Cancer) प्रमाणही सध्या वाढत चालले आहे. स्वादुपिंडाचा कर्करोग जेव्हा स्वादुपिंडात घातक पेशी तयार होतात तेव्हा दिसून येतो. हे एक्सोक्राइन किंवा एंडोक्राइन ग्रंथींच्या कार्यासह स्वादुपिंडाचे कार्यावर परिणाम करते. स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडाच्या (Pancreas) कोणत्याही भागात होऊ शकतो, परंतु बहुतेक स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडाच्या वरच्या भागात दिसून येतो. या प्रकारच्या कर्करोगाची (<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/UbVQH4O) लक्षणे, कारणे आणि उपचारांबद्दल अधिक माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

स्वादुपिंडाचा कर्करोग हा अनेक लोकांसाठी अज्ञात घटक आहे. स्वादुपिंड एखाद्याच्या पित्ताशयाच्या जवळ पोटाच्या मागे स्थित असतो. त्यात इन्सुलिन आणि एन्झाईम्ससह संप्रेरक तयार करण्यास मदत करणाऱ्या ग्रंथींचा समावेश असतो. स्वादुपिंडाचा कर्करोग हा एखाद्याच्या स्वादुपिंडाच्या कोणत्याही भागात अनियंत्रित पेशींची वाढ सुरू झाल्यास दिसून येतो. स्वादुपिंडाच्या कर्करोगाची कारणे म्हणजे पोटाचा संसर्ग, रसायनांचा संपर्क, कौटुंबिक इतिहास, मधुमेह, सिऱ्होसिस, धूम्रपान, जास्त वजन, मद्यपान, धूम्रपान, जास्त चरबीयुक्त आहार आणि आहारात फळे आणि भाजीपाल्याचे समावेश नसणे तसेच वय आणि अनुवांशिक कारणे देखील आहेत.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये कमी भूक, वजन कमी होणे, त्वचेला खाज सुटणे, मळमळ, उलट्या, कावीळ, ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, आणि पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे ही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दिसल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करु नका आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या.  स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे ही नंतरच्या टप्प्यात दिसून येतात. शिवाय स्वादुपिंडाचा कर्करोग हा मधुमेहालाही आमंत्रण देतो. त्यामुळे विलंब न करता नियमित आरोग्य तपासणी करणे योग्य राहिल.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या निदानाबद्दल जाणून घ्या:

सीटी किंवा एमआरआय स्कॅनद्वारे स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे शोधली जातात. तुमचे डॉक्टर योग्य स्कॅनच्या मदतीने निदानाची पुष्टी करण्यास सक्षम असतील.

उपचार:

डॉक्टर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी आणि केमोथेरपी निवडण्यास सांगतील. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांचे जगण्याचे प्रमाण सुधारले आहे.

अशाप्रकारे तुम्ही स्वादुपिंडाचा कर्करोग टाळू शकता:

तुम्हाला धूम्रपान आणि मद्यपान सोडावे लागेल. अति मद्यसेवनामुळे स्वादुपिंडाचा दाह आणि नंतर स्वादुपिंडाचा कर्करोग होतो. इष्टतम वजन राखा, मधुमेह नियंत्रित करा, ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्य खा आणि जंक फूड, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ टाळा. दररोज व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी जीवन जगा.

- डॉ. रॉय पाटणकर, पोटविकार तज्ज्ञ आणि संचालक झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चेंबूर

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health News : स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे, कारणे आणि उपचारhttps://ift.tt/hyzETOn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या