<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/UEFnVQm News : एपिलेप्सी (अपस्मार) हा एक मेंदूचा (<a href="https://ift.tt/FRrUWnp) आजार आहे, ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा शुद्ध हरपते. वेळीच हस्तक्षेप करुन या परिस्थितीचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. एपिलेप्सीची (Epilepsy) कारणे, लक्षणे आणि उपचारांबद्दल या लेखाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. जनजागृतीच्या अभावामुळे याबाबत अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत. सर्व वयोगटातील लोकांना या स्थितीचा त्रास होऊ शकतो. एपिलेप्सीची लक्षणांमध्ये शुद्ध हरपणे, स्नायूंचा ताठरपणा, अचानक कोसळणे आणि हाता-पायांना मुंग्या येणे, ज्ञानेंद्रियांवर परिणाम होणे, भीती वाटणे आदींचा समावेश आहे. काही लोकांना झटका आलेल्या काळात काय घडले ते देखील आठवत नाही.

कारणे

मेंदूला झालेली दुखापत, गंभीर आजार, ताप, पक्षाघात, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे, मेंदूतील गाठ, स्मृतिभ्रंश, एचआयव्ही आणि एड्स आणि मेंदूज्वर, मादक पदार्थांचे सेवन आणि अल्कोहोलचा गैरवापर ही या स्थितीमागील काही कारणे आहेत. शिवाय, झोप न लागणे, आजारपण, ताप, तणाव, विशिष्ट औषधांचे सेवन, जेवण स्किप करणे किंवा अति खाणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे यामुळे ही स्थिती उद्भवते. वेळीच लक्षणे ओळखून विलंब न करता त्वरीत उपचार घेणे आवश्यक आहे.

चक्कर आल्यानंतर पडल्यामुळे एखाद्याला गंभीर दुखापत होऊ शकते. त्याशिवाय, इतर गुंतागुंत म्हणजे नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागणे. अशा प्रकारे, जेव्हा तुम्हाला पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकणारा झटका येतो किंवा तुम्हाला गंभीर दुखापत किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निदान कसे होते?

फेफरे येण्याच्या कारणांचे निदान करण्यासाठी डॉक्टर एमआरआय आणि ईईजी करण्याचा सल्ला देतात. परंतु अपस्माराचे निदान हे क्लिनिकल असते. सामान्य या चाचण्या डॉक्टरांना रुग्णाच्या मेंदूच्या क्रियाकलापांचे निरीक्षण करण्यास आणि त्याचे निदान करण्यासाठी त्याच्या मेंदूचे पुनरावलोकन करण्यास अनुमती देतात

प्रतिबंध कसा कराल?

अपस्मारासारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे नक्कीच फायदेशीर ठरेल असेल. निरोगी राहण्यासाठी आणि मेंदूचे झटके नियंत्रित करण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम केल्याने तुम्हाला तणाव कमी करण्यात आणि तुमचा मूड सुधारण्यास देखील मदत होऊ शकते. तसेच, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांमुळे तणाव कमी होतो. चांगली झोप, इष्टतम वजन राखणे आणि धूम्रपान, मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन टाळणे सुनिश्चित करा.

- डॉ कविता बऱ्हाटे, न्यूरोलॉजिस्ट, एसआरव्ही हॉस्पिटल, डोंबिवली

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health News : एपिलेप्सीच्या म्हणजे काय, जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपचार!https://ift.tt/8quDIhU
0 टिप्पण्या