Health Tips : लेट नाईट पार्टी असो किंवा मॉर्निंग शिफ्ट असो किंवा टेन्शनमुळे झोप न येणे या गोष्टींचा आजकाल प्रत्येकाला त्रास होत आहे. आजकाल तरूणाईत झोप न लागणे ही एक सामान्य समस्या होत आहे. झोप न लागल्यामुळे चिडचिड, भूक न लागणे, डोकं दुखणे, कामात लक्ष न लागणे अशा अनेक समस्या उद्भवतात.

चांगल्या आरोग्यासाठी तरुण वयातील मुला-मुलींनी किमान सात ते आठ तास झोपले पाहिजे, असेही अनेक अभ्यासांमध्ये म्हटले आहे. जर तुम्हाला शरीराला आवश्यक त्या प्रमाणात झोप मिळाली नाही तर त्याचे शरीरावर अनेक परिणाम होतात. आजकाल लोकांना फक्त सहा तासांची झोप घेता येते हा कुठेतरी लपलेला आजार आहे. झोप न लागल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. हे आजार नेमके कोणते त्याबद्दल जाणून घेऊयात.

वजन वाढणे : जर तुम्ही सहा तासांपेक्षा कमी झोपत असाल तर त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासारखा आजार होण्याची भीती असते. कमी झोपेमुळे कॉर्टिसोल, लेप्टिनची पातळी वाढते, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते.

स्मरणशक्तीवर परिणाम : झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूवरही परिणाम होतो. कालांतराने, झोपेची कमतरता हानिकारक प्रथिने सोडू शकते ज्यामुळे जळजळ होते, ज्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारखे आजार होऊ शकतात.

बिघडलेली प्रतिकारशक्ती : पुरेशी झोप न मिळाल्याने संक्रमणांशी लढण्याच्या शरीराच्या क्षमतेवरही परिणाम होतो. तुम्ही किती झोप घेता याचा थेट परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. सायटोकाइन्स केवळ जंतूंशी लढत नाहीत तर झोपेतही मदत करतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कर्करोग : आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप न घेणे देखील कर्करोगाचे कारण असू शकते. अभ्यासात असे दिसून आले आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे कोलन, अंडाशय, स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका लक्षणीय वाढू शकतो. या व्यतिरिक्त, 2010 च्या अभ्यासात असेही आढळून आले की सहा तासांपेक्षा कमी झोपेमुळे आतड्यांसंबंधी कर्करोगाचा धोका 50 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

हृदयविकार : सहा तासांपेक्षा कमी झोपल्याने उच्च रक्तदाब, उच्च कॉलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा झटका आणि दीर्घकाळ स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/K6p3ZUA Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सहा तासांपेक्षा कमी झोप ही धोक्याची घंटा; एक नाही तर 'या' पाच आजारांचा धोकाhttps://ift.tt/3Scmh97
0 टिप्पण्या