Health Tips : आपल्यापैकी अनेकांना वाईट गोष्टींची सवय आहे. जसे की, वेळेवर न झोपणे, जंक फूड खाणे, स्वच्छ न राहणे इ. त्याचप्रमाणे काही लोकांना नखं खाण्याची सवय असते. पण जर तुम्ही नेल कटरऐवजी तोंडाने नखे चावत असाल तर वेळीच काळजी घ्या. कारण असे केल्याने तुम्ही गंभीर समस्येला आमंत्रण देत आहात. तोंडाने नखे खाण्याची सवय अत्यंत हानिकारक आहे. डॉक्टरांच्या मते, तोंडातून नखे खाल्ल्यामुळे पॅरोनिचियाचा संसर्ग होऊ शकतो. हा एक संसर्ग आहे जो खरवडलेल्या त्वचेतून आणि नखांमधून जीवाणू आत प्रवेश करतो आणि विकसित होत जातो.

डॉक्टर सांगतात की जर संसर्ग बराच काळ टिकून राहिला आणि त्यावर उपचार न केल्यास पॅरोनिचियामुळे पू आणि सूज येते. यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि ताप आणि चक्कर येणे देखील होऊ शकते. तसा, पॅरोनिचिया उपचारानंतर बरा होतो. पण, बऱ्याच लोकांमध्ये हा संसर्ग पुन्हा उद्भवू शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गंभीर पॅरोनिचिया संसर्ग बहुतेकदा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये जास्त आढळतो.

पॅरोनिचियाची लक्षणे कोणती?

पॅरोनिचियाच्या वाढत्या संसर्गासह, लक्षणे दररोज बदलत राहतात. जाणून घेऊया त्याची लक्षणे...

1. नखांभोवती त्वचेचा लालसरपणा येणे

2. त्वचा नाजूक होणे

3. पू भरलेल्या फोडांची निर्मिती

4. नखांच्या आकार, रंग आणि पोत मध्ये बदल

5. नखं तुटणे

6. नखांभोवती वेदना

7. ताप आणि चक्कर येणे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पॅरोनिचियावर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर नखं असामान्यपणे वाढलेली दिसू शकतात. त्यांच्या रंगांमध्ये देखील बदल होऊ शकतो, जसे की ते पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे दिसू शकतात.

नखांचं हे संक्रमण कसं टाळावं?

नखांमध्ये संसर्ग किंवा त्यामुळे होणारे आजार या मार्गांनी टाळता येतात:-

1. हात धुतल्यानंतर नेहमी मॉइश्चरायझर लावा

2. नखे चावणे टाळा

3. तुमचे नेल कटर कधीही इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका. नेल कटर वापरल्यानंतर नेहमी धुवा.

4. आपले नखे आणि हात स्वच्छ आणि कोरडे ठेवा.

5. हात विनाकारण ओले करणे टाळा. जास्त वेळ पाण्यात हात ठेवू नका.

6. नखे लहान ठेवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/K6p3ZUA Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : तुम्हाला नखं चावण्याची सवय असेल, तर सावधान; 'या' धोकादायक 'इन्फेक्शन'ला आमंत्रणhttps://ift.tt/vsOftez
0 टिप्पण्या