Plastic Bottle Side Effects : चुकीची जीवनशैली आणि अनहेल्दी आहार यांमुळे आजकाल अनेक आजारांचा धोका वाढतोय. अशातच आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे. पण, आजकाल प्लास्टिकच्या बॉटलचा वापर देखील वाढत चालला आहे. एका संशोधनानुसार असं दिसून आलं आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिला प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्यास प्राधान्य देतात. जे फार धोकादायक आहे. संशोधनानुसार, प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने महिलांमध्ये टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. हा असा आजार आहे, ज्याच्या विळख्यात सध्या भारतातील 8 कोटी लोक आहेत.

संशोधन काय म्हटलं आहे?

संशोधनानुसार, phthalates हे प्लास्टिकमध्ये आढळणारे रसायन आहे, ज्याच्या संपर्कात आल्याने महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. महिलांनी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केल्यास त्यांना मधुमेहाचा धोका असल्याचा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. Phthalates रसायने अतिशय धोकादायक असतात, जी प्लास्टिकमध्ये आढळतात. त्याच्या पकडीमुळे महिलांच्या आरोग्यावर बरेच परिणाम होत आहेत. त्यामुळे महिलांनी किमान प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करावा. प्लास्टिकचा वापरही कमी केला पाहिजे.

phthalates रासायनिक काय आहे?

ग्लोबल डायबेटिक कम्युनिटीच्या वेबसाईटनुसार, या संशोधनात असे सांगण्यात आलं आहे की, फॅथलेट्स रसायनांचा महिलांवर खूप परिणाम होतो. Phthalates अंतःस्रावी व्यत्यय आणणारी रसायने आहेत जी अंतःस्रावी ग्रंथींमधून सोडल्या जाणार्‍या संप्रेरकांमध्ये अडथळा म्हणून काम करतात. या संशोधनात अनेक देशांतील 1300 महिलांचा समावेश करण्यात आला होता. संशोधकांना यामध्ये असं आढळून आले की 30 ते 63 टक्के महिलांना फॅथलेट्स रसायनाच्या संपर्कात आल्याने त्यांना मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनात असेही आढळून आले की phthalates च्या संपर्कात आल्याने कृष्णवर्णीय महिलांवर परिणाम होत नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/nE8Lt1a Tips : सावधान! जांभई घातक ठरू शकते, वारंवार दुर्लक्ष करू नका, 'ही' लक्षणं वेळीच ओळखा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सावधान! महिलांसाठी प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं; 'हा' आजार होण्याची शक्यताhttps://ift.tt/2SBDHzI
0 टिप्पण्या