TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
Health Tips : शरीरावर सतत घामोळे येतायत? सुटका मिळवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय जाणून घ्या
Home Remedies For Ghamori : उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच एक गोष्ट मात्र, कायम सतावते ते म्हणजे घामोळे. आपल्यापैकी अनेकांना प्रत्येक उन्हाळ्यात घामोळे येतात.  यामध्ये त्वचेवर लाल-लाल, छोटे पुरळ दिसतात. हे पुरळ सहसा मान आणि छातीच्या वरच्या भागावर येतात. काहीवेळा, ते कंबरेजवळ, अगदी कोपराजवळही येतात. याचे मुख्य कारण म्हणजे घामाच्या ग्रंथींमध्ये होणारा अडथळा मानला जातो. वैद्यकीय भाषेत याला मिलिरिया असे म्हणतात. याशिवाय घामामुळे इतरही समस्या उद्भवतात. या सर्वांवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
घामोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
मुलतानी मातीचे फायदे : मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. उष्णतेमुळे होणारी उष्माघात याच्या वापराने कमी करता येते. मुलतानी मातीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत. ते बुरशी, बॅक्टेरिया, विषाणू वाढण्यापासून प्रतिबंधित करते. घामोळ्यांची उष्णता टाळण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीची पेस्ट लावू शकता.
मुलतानी मातीचा 'असा' वापर करा
एक किंवा दोन चमचे मुलतानी माती घ्या, आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि पेस्ट बनवल्यानंतर घामोळ्यांच्या भागावर लावा. 15 मिनिटांनी कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून 4 दिवस असे केल्यास उन्हापासून आराम मिळेल.
कसे वापराल?
दोन चमचे चंदन पावडरमध्ये 4 ते 5 चमचे गुलाब जल टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट प्रभावित भागावर लावा. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही ते थंड पाण्याने धुवा. हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरले जाऊ शकते. याचा मोठा फायदा होऊ शकतो.
दह्यापासून मिळेल आराम : घामोळ्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. दह्यामध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म देखील असतात जे बॅक्टेरियाशी लढण्यास सक्षम असतात. यासाठी एका भांड्यात दही घेऊन थोडे ढवळावे. आता ही पेस्ट घामोळे आलेल्या भागावर लावा. 15 ते 20 मिनिटांनी पाण्याने धुवा. तुम्ही हे दिवसातून एकदा वापरू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/uvM6mQP Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : शरीरावर सतत घामोळे येतायत? सुटका मिळवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय जाणून घ्याhttps://ift.tt/xTLt5yZ
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या