Health Tips : भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहे. एका ऑनलाईन औषध फार्मसीच्या सर्व्हेक्षणानुसार, असे आढळून आले की भारतातील सुमारे 76 टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहे.

ऑनलाईन औषध फार्मसी सर्वेक्षण काय म्हणतात?

भारतातील 87 टक्के तरुणांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्याचे त्यांच्या अहवालात समोर आले आहे. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डीची तीव्र कमतरता आढळून आली आहे. 25-40 वयोगटातील 81 टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. या सर्व्हेक्षणामुळे एक गोष्ट लक्षात येते की आपण घरात कितीही सक्रिय असलो तरी उन्हात बसलेच पाहिजे. आपल्या शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा.

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत आहे

व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोणत्या वेळी सूर्यप्रकाश घेणं फायदेशीर आहे. यावर अनेक संशोधकांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही दररोज सकाळी 10-15 मिनिटं सूर्यप्रकाशात बसलात तर हे UVB किरण सर्वात जलद असतात. त्याचाही शरीरावर चांगला परिणाम होतो. सकाळी 9 वाजण्याच्या आत तुम्ही सूर्यप्रकाश घेऊ शकता. त्याचा थेट फायदा तुमच्या शरीराला होतो.

सकाळच्या सूर्याची किरणे तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवत नाहीत. तसेच तुम्हाला त्वचेचा कर्करोग किंवा त्वचेची जळजळीची चिंता करण्याची गरज नाही.

सकाळी 'या' वेळी उन्हात बसावे

तुम्ही हिवाळ्याच्या सकाळी म्हणजे सकाळी 7 ते 9 या वेळेत उन्हात बसू शकता. यावेळी, त्वचा व्हिटॅमिन डी जलद आणि अधिक प्रमाणात तयार होते. पण उन्हाळ्यात उन्हात बसण्याची घाई करावी लागते कारण उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी 9 वाजेपर्यंत उष्णता खूप वाढते. जर तुम्ही उन्हाळ्यात उष्णतेमध्ये बसत असाल तर तुमचे शरीर पूर्णपणे हायड्रेटेड ठेवा.

व्हिटॅमिन डीचे फायदे

व्हिटॅमिन डी तुमच्या शरीराला कॅल्शियम पुरवते. हाडे कमकुवत होण्यापासून प्रतिबंधित करते. श्वसनमार्गाचे संक्रमण, श्वास लागणे, तणाव, नैराश्य, हृदयविकार, स्नायू दुखणे, पक्षाघात आणि लठ्ठपणा यांना काही प्रमाणात प्रतिबंध करण्यास मदत करते.

विशेषतः खाद्यपदार्थांमध्ये. सॅल्मन आणि ट्यूना माशांमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. अंड्याच्या पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी आढळते. भाज्यांमध्ये मशरूममध्ये देखील जीवनसत्व आढळते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/YqhxKJ6 Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत; सकाळची 'ही' वेळ व्हिटॅमिन डी घेण्यासाठी योग्यhttps://ift.tt/EK5yvfO
0 टिप्पण्या