Workout Tips : आजकालच्या धावपळीच्या काळात स्वत:ला फिट ठेवणं फार गरजेचं आहे. योग प्राचीन काळापासून आपल्या जीवनाचा एक भाग आहे. यामुळे शरीरच नाही तर मनही सक्रिय राहते. पण ते चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचेही नुकसान होऊ शकते. योगामध्ये काही गोष्टी न करण्याचा सल्ला दिला जातो. जसे की, ज्या लोकांना पोटाचा कोणताही आजार आहे त्यांना हेडस्टँड न करण्यास सांगितलं जातं. 'ओम'चा उच्चार देखील काही परिस्थितींमध्ये घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही योगा करत असाल तर योग्य ट्रेनरची मदत घ्या.

ट्रेडमिलवर चालणे

आजकाल प्रत्येकाकडे ट्रेडमिल किंवा जिम असलेली सायकल असते. या मशीनवर अचानक किंवा जास्त धावणे देखील हानिकारक असू शकते. आजकाल अशा अनेक केसेसमधून ट्रेडमिलच्या वापरामुळे आरोग्यावर परिणाम झाला, ट्रेडमिलवर चालताना हृदयविकाराचा झटका आला हे दिसून आलं आहे. वजन जास्त असताना आणि अनेक दिवसांनी अचानक व्यायाम केल्यास असे होऊ शकते. उच्च रक्तदाब आणि साखर अनियंत्रित झाल्यास असे होते. याचं एक कारण म्हणजे ट्रेडमिल किंवा जिम सायकलिंग नेहमी बंद जागेत केले जाते, त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि आरोग्यास धोका निर्माण होतो.

जॉगिंग करणे

जॉगिंग हा सर्वोत्तम व्यायामांपैकी एक आहे. हे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे, पण जर तुम्ही एखाद्या दिवशी अचानक धावू लागलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही. 40 वर्षांनंतर अचानक धावणे किंवा वाढलेल्या वजनाने जॉगिंग करणे हाडांसह हृदयासाठी हानिकारक आहे. जे दैनंदिन कसरत करतात, खेळाडू किंवा सैन्यदल दररोज अनेक किलोमीटर धावतात, त्यांना याचा फायदा होतो. कारण तो त्यांचा दिनक्रम आहे आणि त्यासाठी ते वॉर्म-अप, स्ट्रेचिंग, योग्य लाईफस्टाईल आणि योग्य धावण्याचे प्रशिक्षण घेतात. जॉगिंग करताना शरीराचा संपूर्ण भार एकाच वेळी पायावर पडतो ही वस्तुस्थिती आहे. त्याचे नुकसान स्नायूंना आणि हृदयाला होऊ शकते. जर तुम्हाला धावण्यास सुरुवात करायची असेल तर सर्वात आधी योग्य शूज निवडा आणि सतत वेगाने चालण्याचा सराव करा. प्रथम 5 मिनिटे धावण्यास सुरू करा आणि नंतर हळूहळू पुढे जा.

इतर व्यायाम

झुंबा, एरोबिक्स, दोरीवर उडी मारणे, मार्शल आर्ट्स यांसारखे व्यायाम अचानक सुरू करू नका. त्याचे नुकसान केवळ हाडे आणि स्नायूंनाच होत नाही तर मणक्यालाही धोका निर्माण होतो. यासोबतच हृदय, यकृत या अवयवांवरही परिणाम होतो. तुमचे वजन जास्त असल्यास, सर्वप्रथम एखाद्या तज्ञाकडून योग्य व्यायाम निवडा आणि नंतर पुढे जा.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Workout Tips : चुकीच्या पद्धतीने केलेले 'हे' वर्कआउट केवळ फायदाच नाही तर नुकसानही देतात, जाणून घ्या कसे?https://ift.tt/p8BhqsH
0 टिप्पण्या