<a href="https://ift.tt/8QdZv0W England Open Badminton Championships 2023 : ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चँपियनशिपमध्ये (All England Open Badminton 2023) भारतीय महिला दुहेरी जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. ट्रीसा जॉली (Treesa Jolly) आणि गायत्री गोपीचंद (Gayatri Gopichand) या भारतीय महिला दुहेरी जोडीने गुरुवारी बर्मिंगहॅममध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत जपानला मात देत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती ट्रीसा आणि गायत्री यांनी माजी जागतिक क्रमवारीत युकी फुकुशिमा आणि सायाका हिरोटा यांचा 21-14, 24-22 असा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. जागतिक क्रमवारीत 17व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिला जोडीचा पुढील सामना चीनच्या ली वेन मेई आणि लिऊ झुआन जुआन या जोडीशी होणार आहे.

जपानचा पराभव करत गाठली उपांत्यफेरी

ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने अप्रतिम शानदार विजयासह चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जॉली आणि गायत्री यांनी तुफान खेळी करत जपानच्या युकी फुकुशिमा आणि सायाका हिरोटा या जोडीचा 21-14, 24-22 असा पराभव केला. गेल्या वेळी याच भारतीय जोडीने या चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठली होती. दरम्यान, आता भारतीय महिला जोडीचा उपांत्यफेरीतील सामना चीनसोबत होणार आहे. भारतीय ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला चीनच्या ली वेन मेई आणि लिऊ झुआन जुआन यांच्या आव्हानाला सामोरं जावं लागेल.

#AllEngland2023 #Badminton: ट्रीसा जॉली और गायत्री गोपीचंद ने बर्मिंघम में ऑल इंग्लैंड चैंपियनशिप के क्वार्टर फाइनल में जगह बनाने के लिए विश्व की पूर्व नंबर एक जोड़ी युकि फुकुशिमा और सयाका हिरोता को एक रोमांचक मुकाबले में 21-14, 24-22 से हराया। pic.twitter.com/J6t6cqsbsc
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) March 17, 2023

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चँपियनशिपमध्ये भारताची शेवटची आशा

बर्मिंघम येथे सुरु असलेल्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चँपियनशिपमध्ये महिला दुहेरी श्रेणीत भारताला शेवटची संधी आहे. ज्यांच्याकडून भारताला ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत खूप आशा होत्या, असे एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू यांच्या पदरी निराशा आली आहे. पुरुष एकेरीतही भारताचं आव्हान पूर्णपणे संपुष्टात आलं आहे. पुरुष दुहेरीतही स्टार जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी बाहेर पडली आहे. चॅम्पियनशिपमध्ये भारताची शेवटची आशा आता महिला दुहेरी जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद आहेत. भारतीय महिला दुहेरी जोडी उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/AjqXiZS vs AUS : आज रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Badminton : ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ऑल इंग्लंड चँपियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत, जपानच्या खेळाडूंना दिली मातhttps://ift.tt/m0CIjE5
0 टिप्पण्या