Health Tips : शरीराला दैनंदिन हालचाल करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. माणसाला दिवसभर आहारातून ऊर्जा मिळते. योग्य कॅलरीजसाठी फक्त पौष्टिक अन्नच खावे, असा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की अन्न खाण्याची आणि पचण्याची एक वेळ असते. जर तुम्ही त्यावेळी अन्न खात नसाल आणि इतर वेळी खाणे पसंत केले तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, सर्व काही रिकाम्या पोटी खाऊ नये. त्यामुळे शरीरात अनेक समस्या सुरू होतात. रिकाम्या पोटी अन्न खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते? हे जाणून घेऊयात.

जास्त कॅफिन टाळा

चहा आणि कॉफीमध्ये भरपूर कॅफीन आढळते. या कॅफीनमुळे कोणतीही व्यक्ती चहा किंवा कॅफीन प्यायली की त्या व्यक्तीला लगेच ऊर्जा जाणवते. पण त्याचा दुष्परिणाम म्हणजे रिकाम्या पोटी प्यायल्याने अॅसिडिटीची गंभीर समस्या उद्भवू शकते. अल्सर होण्यासोबतच गॅस्ट्रिकचा त्रास होऊ शकतो.

सकाळी दही खाऊ नका

दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॅक्टिक ऍसिड असते. सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने पोटातील अॅसिडिक पातळी वाढते. तर दही पोटात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांनाही अनेक वेळा नुकसान पोहोचवते.

कच्च्या भाज्या खाऊ नका

कच्च्या भाज्या सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. खरंतर, सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या खाल्ल्याने पोटदुखी आणि पोट खराब होऊ शकते. कच्च्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते असं सांगितलं जातं. पण सकाळी कच्च्या भाज्या खाल्ल्याने तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आंबट फळे खाऊ नका

आंबट फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत. यामुळे अॅसिडिटी, अपचन किंवा अॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्या उद्भवू शकतात. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड असते. त्यामुळे अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/rNp0Bue Tips : चुकीच्या पद्धतीने केलेले 'हे' वर्कआउट केवळ फायदाच नाही तर नुकसानही देतात, जाणून घ्या कसे?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : रिकाम्या पोटी काहीही खात असाल तर काळजी घ्या; ही सवय तुमच्यासाठी धोकादायकhttps://ift.tt/er9C7Ol
0 टिप्पण्या