Vitamin D Benefits : हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेट पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, जे निरोगी हाडे, दात आणि स्नायू राखण्यासाठी आवश्यक आहेत. त्याचबरोबर केसगळतीच्या समस्येवरही व्हिटॅमिन डी फार गरजेचा आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतो. उन्हाळ्यात तसं सूर्यप्रकाशात उभं राहणं कठीणच आहे. पण, व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी तुम्हाला सूर्यप्रकाशात दर दोन ते तीन दिवसांनी पाच ते पंधरा मिनिटं सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य निरोगी राखण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.

व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ सूर्यापासून अधिकाधिक व्हिटॅमिन डी घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. या दरम्यान, UVB किरण अधिक कार्यशील असतात. असं मानलं जातं की, शरीर अधिक वेगाने व्हिटॅमिन डी तयार करते. उन्हात थोडा वेळ घालवूनही शरीराला दिवसभर आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्व मिळू शकते. व्हिटॅमिन डी कौन्सिलचा अंदाज आहे की गोरी त्वचा असलेल्या व्यक्तीसाठी यासाठी 15 मिनिटे लागू शकतात, तर डार्क त्वचेच्या व्यक्तीसाठी काही तासांपर्यंत सूर्यप्रकाश घेणं गरजेचा आहे.

ढगाळ वातावरण असताना तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकेल का?

ढगाळ वातावरण असतानाही सूर्य काही प्रमाणात व्हिटॅमिन डी देऊ शकतो. याशिवाय, सूर्याच्या किरणांवर अवलंबून न राहता इतर स्त्रोतांकडून व्हिटॅमिन डी तुम्ही घेऊ शकता. जसे की, फळं, मांसाहारी पदार्थ, प्रोटीन इ.

व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टी खाव्यात

फॅटी मासे, अंड्यातील पिवळा बलक यांचा आहारात समावेश करा. यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेच्या 'या' लक्षणांकडे लक्ष द्या

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक लक्षणे उद्भवू शकतात, जसे की, थकवा आणि अशक्तपणा, स्नायू दुखणे आणि हाडे दुखणे, हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढणे, जखमा बरे होण्यात अडचण, मूड स्विंग होणे जसे की चिंता, केस गळणे. म्हणूनच कोणताही ऋतू असो, काही काळ व्हिटॅमिन डी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकता. कारण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/VKtIWcG Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Vitamin D Deficiency : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस गळतात; तुमच्यासाठी सूर्यप्रकाश किती आवश्यक? जाणून घ्याhttps://ift.tt/V4Zkurw
0 टिप्पण्या