MBA CET: राज्य सीईटी सेलमार्फत एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ आणि २६ मार्च रोजी राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने सीईटी घेण्यात आली. राज्यातील १९१ केंद्रांवर ही सीईटी झाली. मात्र पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना सीईटी देता आली नाही. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षेची यंत्रणाच बंद पडली होती. त्यामुळे एमबीए सीईटी पुन्हा एकदा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली होती.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mba-cet-now-on-27th-april/articleshow/99339213.cms
0 टिप्पण्या