RTE Admission: प्रवेश घेताना संकेतस्थळावर येणाऱ्या असंख्य तांत्रिक अडचणींमुळे प्रवेशप्रक्रियाच पूर्ण करता येत नसल्याची तक्रार पालकांकडून व्यक्त केली जात होती. याबाबत शिक्षण विभागानेही आपली बाजू मांडताना पोर्टलवर अधिक भार येत असल्याने तांत्रिक अडचणी येत असल्याचे मान्य केले. त्याचबरोबर पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
source https://maharashtratimes.com/career/career-news/rte-admission-deadline-for-right-to-education-admission-extended/articleshow/99749573.cms
0 टिप्पण्या