Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३, एप्रिल २८, २०२३ WIB
Last Updated 2023-04-28T15:50:09Z
careerLifeStyleResults
Side Effects Of Coffee: सकाळी उठताच कॉफी पित असाल तर सावधान! फायद्यांपेक्षा नुकसानच जास्त
Advertisement
<a href="https://ift.tt/zbaAp9L Effects Of Coffee: बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये 'क्या सुपर कूल हैं हम'ची अभिनेत्री नेहा शर्माने (Neha Sharma) तिच्या आहाराबद्दल बोलताना सांगितले की, एकेकाळी ती एक कप कॉफीनेच दिवसाची सुरुवात करायची. दर तासाला ती कॉफी (Coffee) प्यायची. पण ती एक वाईट सवय असल्याचे नेहाने सांगितले. पण आता तिने ही सवय बदलली आणि आता सकाळची सुरुवात ती गरम पाणी आणि लिंबूने करते. आता प्रश्न असा आहे की, नेहा शर्माने सकाळी उठताच कॉफी पिण्याच्या सवयीला वाईट का म्हटले? त्याचं कारण म्हणजे रिकाम्या पोटी सकाळी कॉफी पिणे हानिकारक आहे. जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम...
रिकाम्या पोटी कॉफी पिणे हानिकारक
छातीत जळजळ
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये छातीत जळजळ होण्याच्या समस्येचाही समावेश आहे. छातीत जळजळ झाल्यामुळे छातीच्या मध्यभागी वेदना होते किंवा अस्वस्थता येते. कॉफीमुळे पोटातील अॅसिडचे उत्पादन थांबते आणि पोटाची पीएच पातळी कमी होते, त्यामुळे पोटात जळजळ होते. जर तुम्ही दुधासोबत कॉफी पित असाल आणि कॉफी पिण्याआधी काही खाल्ले असेल तर हानी कमी होऊ शकते, त्यामुळे पीएच पातळी देखील फारशी कमी होत नाही.
कॉफी आणि कॉर्टिसोल पातळी
सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिणे खूप हानिकारक आहे. संशोधनानुसार, झोपेतून उठल्यानंतर एक तास शरीरात कॉर्टिसोलचे उत्पादन जास्त असते. त्यामुळे शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन कॉर्टिसोलची पातळी वाढवण्याचे काम करते. जेव्हा शरीर आधीच उच्च पातळीवर कॉर्टिसोल तयार करत असते तेव्हा कॅफिन त्याची क्षमता कमी करते.
आतड्यांवर होतो परिणाम
कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?
अभिनेत्री नेहा शर्माने ज्या पद्धतीने कॉफी पिण्याची सवय बदलली आहे, त्यानुसार उठल्यानंतर किमान एक तासाने कॉफी किंवा चहा प्यावा. ब्लॅक कॉफीऐवजी दुधासोबत कॉफी प्यायल्याने आतड्यांसंबंधी प्रणालीवर कमी परिणाम होतो. सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल तर पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि अधिकाधिक पाणी प्या. उठल्यानंतर कॉफीऐवजी पाणी पिणे फायदेशीर ठरते. लिंबाचा रस पिळून कोमट पाणी प्याल तर ते आरोग्यासाठी उत्तम ठरेल.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Side Effects Of Coffee: सकाळी उठताच कॉफी पित असाल तर सावधान! फायद्यांपेक्षा नुकसानच जास्तhttps://ift.tt/1L84FRz