TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Skin Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, घरीच तयार करा 'हे' पाच फेस पॅक!

<a href="https://ift.tt/VE9mi0u Care Tips : उन्हाळ्यात (<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/6ymHiDY) त्वचा हायड्रेट ठेवणं आणि त्वचेच्या खोलपर्यंत स्वच्छ करणं खूप महत्वाचे आहे. असं केली नाही तर आपली त्वचा लवकर खराब होऊ शकते. विशेषत: चेहऱ्याची त्वचा (Skin). कारण चेहऱ्याची त्वचा ही अतिशय नाजूक असते. त्यामुळे उन्हाळ्यात फेस पॅक (<a href="https://ift.tt/heOwaC9 Pack) लावून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची खास काळजी घेऊ शकता. या लेखात पाच फेस पॅकबाबत माहिती देणार आहोत, जे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी योग्य असतील. जाणून घेऊया हे पाच फेस पॅक कोणते आणि ते कसे बनवायचे?

फ्रेंच ग्रीन क्ले फेस पॅक

फ्रेंच ग्रीन फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात पाव चमचा मध घेऊन त्यात थोडं पाणी घालून पातळ करा. यानंतर त्यात एक अंड्याचा पांढरा भाग घाला, नंतर त्यात एक चमचा फ्रेंच ग्रीन क्ले मिसळा. इसेन्शियल ऑईलचे काही थेंब घालून मिश्रण एकजीव करुन त्यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. फेस पॅक सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करा.

बेंटोनाईट क्ले पॅक

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी बेंटोनाईट क्ले फेस मास्क फारच फायदेशीर आहे. हा फेस पॅक तयार करण्यासाठी, 3 ते 4 चमचे बेंटोनाईट क्ले घ्या. त्यात 5 ते 7 थेंब इसेन्शियल ऑईल टाका. मग त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि मिश्रण एकजीव करुन पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्याला लावा.

अॅवाकाडो क्ले फेस मास्क

अॅवाकाडोमुळे आपल्या त्वचेमधील कोलेजन वाढतं आणि त्वचेची जळजळ आणि सूज कमी होते. यात व्हिटॅमिन ई देखील आढळते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. एवोकॅडो क्ले मास्क बनवण्यासाठी प्रथम एवोकॅडो मॅश करा, नंतर त्यात फेटलेलं दही आणि मध घालून पेस्ट बनवा. तयार झालेला फेस पॅक चेहऱ्यावर लावा.

मुल्तानी क्ले मास्क

मुल्तानी मातीचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेत. मुल्तानी माती आपल्या चेहऱ्यावरील घाण काढून टाकते आणि तेलावर नियंत्रण ठेवते. मुल्तानी क्ले मास्क बनवण्याची कृती जाणून घेऊया. यासाठी एक चमचा मुल्तानी मातीमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब टाका, अर्ध्या लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा. हा पेस पॅक चेहऱ्याला लावा आणि वाळल्यानंतर चेहरा धुवून टाका

चारकोल क्ले मास्क

चारकोल क्ले मास्क हा त्वचेतील घाण आणि तेल काढतो आणि छिद्रे बंद करतो. चारकोल क्ले फेस मास्क बनवण्यासाठी कोळशाच्या कॅप्सूल घ्या. एका वाटीत चारकोलच्या कॅप्सूल रिकाम्या करा. नंतर त्यात चिमूटभर हळद आणि कोरफड जेल टाका, टी ट्री ऑईलचे काही थेंब टाका आणि मिश्रण एकजीव करा. तयार पेस्ट चेहऱ्याला लावा आणि काही वेळाने वाळल्यानंतर धुवून टाका.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, घरीच तयार करा 'हे' पाच फेस पॅक!https://ift.tt/47qOTnG

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या