Unauthorized Schools: गेल्या काही वर्षांत राज्यभरात अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. पालकांना याबाबत फारशी माहिती नसल्यामुळे अनेकदा शाळांमार्फत त्यांची फसवणूक केली जाते. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणादरम्यान नाशिकच्या वडाळा परिसरातील शाळेची केवळ कागदोपत्री नोंद असल्याचे व प्रत्यक्षात शाळाच नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर राज्यभरात केलेल्या तपासणीमध्ये जवळपास साडेसहाशे शाळा अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली होती.
source https://maharashtratimes.com/career/career-news/nashik-unauthorized-schools-information-will-be-taken/articleshow/99634952.cms
0 टिप्पण्या