Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
मंगळवार, ९ मे, २०२३, मे ०९, २०२३ WIB
Last Updated 2023-05-09T16:49:36Z
careerLifeStyleResults
Beauty Tips: तुम्हीही अशा प्रकारे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढताय का? जर होय, तर सावधान! तुमची त्वचा होतेय खराब
Advertisement
Skin Care Tips: ब्लॅकहेड्स (Blackheads) चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करतात. चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये (Skin Pores) साचलेली ही घाण असते, जी काढताना सहजासहजी बाहेर पडत नाही. जास्त प्रदुषणामुळे देखील चेहऱ्यावर धूळ जमा होऊन ब्लॅकहेड्स तयार होतात. ते चेहऱ्यावर काळ्या ठिपक्यांसारखे दिसतात. ब्लॅकहेड्स मुख्यत: नाकावर, हनुवटीच्या जवळ किंवा कधीकधी गालावर देखील तयार होतात.
ब्लॅकहेड्स वेळोवेळी काढून टाकणे आवश्यक आहे. तथापि, ते काढताना काही खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण त्वचा खराब होऊ शकते. ब्लॅकहेड्स दूर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊया.
नखांचा वापर करु नका
ब्लॅकहेड्स काढताना कधीही नखं (Nails) वापरू नका. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सची मुळे (Roots) आत खोलवर असतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही त्यांना नखांनी काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा चेहऱ्यावर मुरुम (Pimples) येण्याचा धोका असतो. काहीवेळा नखांनी ब्लॅकहेड्स काढताना जखमा देखील होऊ शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर डाग (<a href="https://ift.tt/AagiZdj Spots) पडतात.
ब्लॅकहेड्स काढणाऱ्या यंत्राचा योग्य वापर करा
ब्लॅकहेड रिमुव्हरने (Blackhead Remover) ब्लॅकहेड्स काढून टाकल्यानंतर काही लोक ते न धुता ठेवून देतात आणि नंतर ते तसेच पुन्हा वापरतात. असे केल्यास त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात किंवा इतर समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून जेव्हाही तुम्ही मेटल ब्लॅकहेड रिमुव्हर (Metal Blackhead Remover) वापरता तेव्हा ते पाण्याने धुवून कॉटन वाइपने (Cotton Wipe) पुसून स्वच्छ करुन ठेवा.
चेहरा खूप जोरात स्क्रब करू नका
तेलकट त्वचेतील ब्लॅकहेड्स कसे काढावे?
कोरड्या त्वचेच्या (Dry Skin) तुलनेत तेलकट त्वचेवरील (Oily Skin) ब्लॅकहेड्स काढणे खूप कठीण आहे. कारण चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलाला घाण (Dirt) लवकर चिकटते आणि नंतर त्याचे ब्लॅकहेड्स बनतात. तेलकट त्वचेवरील ब्लॅकहेड्स काढण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. जर त्वचा कोरडी असेल तर प्रथम त्वचा मॉइश्चराइझ (Moisturise) करा आणि नंतर ब्लॅकहेड्स (Blackheads) काढून टाका.
सेफ्टी पिन किंवा रेझर वापरू नका
नाकावरील ब्लॅकहेड्स (Blackheads) काढण्यासाठी अनेक वेळा लोक सेफ्टी पिन (Safety Pin) किंवा रेझर (Razor) वापरतात. त्यामुळे त्वचा सोलण्याची भीती असते आणि त्वचेला त्रास होऊ शकतो. चेहऱ्याची त्वचा अतिशय संवेदनशील (Sensitive) आणि मऊ (Soft) असते, त्यामुळे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी सेफ्टी पिन वापरल्यास त्वचा खराब होऊ शकते. घरी ब्लॅकहेड्स काढण्यात अडचण येत असेल तर ब्युटी पार्लरची (Beauty Parlour) मदत घ्या.
हेही वाचा:
<a href="https://ift.tt/CDQdzEF Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Beauty Tips: तुम्हीही अशा प्रकारे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढताय का? जर होय, तर सावधान! तुमची त्वचा होतेय खराबhttps://ift.tt/k13FD0J