Advertisement

Best Position To Eat : सध्या आपल्या जीवनशैलीत अत्यंत वेगाने बदल होत आहेत. या बदलांचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. यामुळे आपल्या सवयीमध्येही झटपट बदलत होत आहेत. आपलं दैनंदिन राहणीमान, उठणं आणि बसणं असो किंवा खाणं-पिणं असो प्रत्येक गोष्टीत वेगानं बदल होत आहेत. हा सर्व बदल टीव्ही, सिनेमा आणि सोशल मीडियामुळेही झाला आहे. सध्या आधुनिकीकरणामुळे खुर्ची आणि टेबलावर बसून जेवण करायचा ट्रेंड आहे. अनेकांना वेळ नसल्यामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे उभं राहून आणि चालत-चालत जेवण करतात. परंतु, जेवण करायची सर्वांत योग्य पद्धत (Eating Best Position) कोणती आहे हे बहुतांश लोकांना माहितीच नसते. आपल्या देशात अनेक वर्षापासून सुखासन किंवा पद्मासन अशा आसनात बसून जेवण केलं जातं. ही सर्वात चांगली पद्धत समजली जाते. या सुखासन (Sukhasana) पद्धतीने बसून जेवण केल्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

अपचनाची समस्या होतात दूर :

आपल्या घरात वडीलधाऱ्या माणसांकडून नेहमी खाली बसून जेवण करायचा सल्ला दिला जातो. याचं कारण बसून जेवण केल्यामुळे आपले शरीर पोषक तत्वांना चांगल्या पद्धतीने शोषूण घेऊ शकते. यामुळे पचनसंस्था सुदृढ आणि निरोगी राहते. त्यामुळे नेहमी जमिनीवर बसून जेवण करा.

मन शांत राहतं :

सुखासन आणि पद्मासन पद्धतीने बसल्यामुळे मन शांत होतं. या पद्धतीने बसल्यामुळे तणाव दूर होतो आणि आरामदायी वाटतं. म्हणून नेहमी जमिनीवर बसून जेवण करा. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. शांतचित्ताने जेवण केल्यामुळे चांगल्या पद्धतीने पचन होतं. त्यामुळे जेवण करताना ही गोष्ट लक्षात ठेवा.

लवचिकपणा वाढतो :

सुखासन पद्धतीने बसून जेवण केल्यामुळे शरीर लवचिकपणा वाढतो. यामुळे पाय आणि स्नायूचा व्यायम होतो. तसेच तुमचे स्नायू बळकट होण्यास मदत मिळते. यामुळे नेहमी जमिनीवर बसून जेवण करायचा प्रयत्न कारा.

पाठ दुखीची समस्या होते दूर :

जमिनीवर बसून जेवण केल्यामुळे शरीराची बसण्याच्या पद्धतीत सुधारणा होते. या आसनात बसल्यामुळे पाठीचा कणा सरळ होतो आणि पाठ दुखीच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

ब्लड सर्क्युलेशन होते सुरळीत :

सुखासन आसन पद्धतीत बसून जेवण करताना आपण क्रॉललेग स्थितीत असतो. यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होते आणि तुमच्या स्नायूंवर दाब पडून आराम मिळतो. पचनसंस्था सृदृढ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच खाली बसून जेवण केल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.

वाचा इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/j3dX0nx Chapati Health Benefits And Risk : तुम्ही रात्रीच्या जेवणात दूध-चपाती खाता? जाणून घ्या याचे फायदे आणि दुष्परिणाम!

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Best Position To Eat : खुर्ची किंवा टेबलवर बसून नव्हे, तर 'या' पद्धतीने जेवण केल्यामुळे होतो फायदाhttps://ift.tt/kew5IQb
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Best Position To Eat : खुर्ची किंवा टेबलवर बसून नव्हे, तर 'या' पद्धतीने जेवण केल्यामुळे होतो फायदाhttps://ift.tt/kew5IQb