Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ११ मे, २०२३, मे ११, २०२३ WIB
Last Updated 2023-05-11T16:48:52Z
careerLifeStyleResults

नेल कटरमध्ये असलेल्या 'या' दोन चाकूंचा उपयोग काय? उत्तर जाणून घ्या, अनेक गोष्टी  होतील सोप्या

Advertisement

Nail Cutter Use: आजच्या व्यस्त जीवनात लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. खाणे-पिणे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींव्यतिरिक्त वैयक्तिक काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. हात आणि पायाचीदेखील काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यांची स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं आहे. नखे जर मोठी असतील तर त्यामध्ये घाण साचू शकते आणि आपल्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. ही नखं कापण्यासाठी नेल कटरचा वापर केला जातो. पण केवळ नखं कापण्यासाठीच नव्हे तर अनेक गोष्टींसाठी नेल कटरचा वापर होतो. नेल कटरमध्ये चाकू सारख्या दोन वस्तू असतात त्यांचा उपयोग जाणून घेतल्यास तुमची अनेक कामं सोपी होतील.

वास्तविक नेल कटरचे काम फक्त नखे कापण्याचे असते. पण त्याव्यतिरिक्त त्याची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यात दोन चाकूसारखे उपकरण जोडण्यात येतात. त्यामुळे नखे ​​कापण्याशिवाय इतर अनेक कामांमध्ये त्याचा वापर करता येतो. यामध्ये वापरलेले दोन वेगवेगळ्या प्रकारचे चाकू कोणत्या उद्देशाने वापरले जातात ते जाणून घेऊया.

बाटलीचे टोपण उघडण्यासाठी ओपनरसारखा वापर

नेल कटरमध्ये लहान दोन चाकू जोडल्यानंतर नेल कटरची उपयुक्तता वाढली आहे. त्यामुळे ते तुम्ही कोणत्याही सहलीला सोबत घेऊन जाऊ शकता आणि त्याचा वापर अनेक कारणांसाठी करु शकता. जर तुम्ही कुठेतरी बाहेर असाल आणि तुम्हाला कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचे झाकण उघडायचे असेल तर ती तोंडाने उघडण्याची चूक कधीही करू नका. त्यापेक्षा यासाठी तुमच्या बॅगेत ठेवलेले नेल कटर वापरा. नेल कटरमध्ये एक वक्र चाकू असतो, तो बाहेर काढा. त्यानंतर तुम्ही त्याच्या मदतीने बाटलीचे झाकण अगदी सहज उघडू शकता.

लहान चाकू काम

तुम्ही सहलीवर असाल किंवा घराबाहेर असाल तर नेल कटरमध्ये असलेल्या छोट्या चाकूच्या मदतीने लिंबू, संत्री किंवा अशी कोणतीही वस्तू तुम्हाला सहज कापता येईल. याशिवाय काही लोक या चाकूच्या धारदार टोकाचा वापर करून नखांतील घाण साफ करतात. तथापि, असे करणे योग्य नाही, कारण जर थोडीशी चूक झाली तर त्याची तीक्ष्ण टोके तुमच्या बोटाला टोचू शकतात आणि तुम्हाला दुखापत करू शकतात.

त्यामुळे नेल कटरचा वापर नखं काढण्याव्यतिरिक्त अजून इतर कामांसाठीही होऊ शकतो, त्यातील इतर दोन लहान चाकू अनेक कामांसाठी वापरता येऊ शकतात.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/Hoqz3IB Liquor: दारू बनावट आहे की ओरिजिनल कसे ओळखाल? दारू खरेदी करताना काय काळजी घ्याल?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: नेल कटरमध्ये असलेल्या 'या' दोन चाकूंचा उपयोग काय? उत्तर जाणून घ्या, अनेक गोष्टी  होतील सोप्याhttps://ift.tt/U26gbeY