Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १७ मे, २०२३, मे १७, २०२३ WIB
Last Updated 2023-05-17T10:43:40Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

BSF ची भरती निघाली, बारावी पास उमेदवार करू शकतात अर्ज, इतका मिळेल पगार Rojgar News

Advertisement
BSF ची भरती निघाली, बारावी पास उमेदवार करू शकतात अर्ज, इतका मिळेल पगार

पगार

भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला पे-मॅट्रिक लेवल ३ स्केल २५ हजार ५०० रुपयांपासून ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळेल.

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डात फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्समध्ये कमीत-कमी ६० टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, बारावीनंतर आयटीआयचे उमेदवारही अर्ज करू शकतात.

 

वयोमर्यादा

उमेदवाराच्या वयाची तारीख १२ मे २०२३ रोजी गृहित धरली जाईल. वय कमीत-कमी १८ ते जास्तीत जास्त २५ वर्षे राहील. परंतु, आरक्षित वर्गातील उमेदवाराला वयोमर्यादेत काही सुट दिलेली आहे.

जागांची माहिती

बीएसएफअंतर्गत जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, हेड कॉन्स्टेबलचे (रेडियो ऑपरेटर) २१७ पदं आणि हेड कॉन्स्टेबलची (रेडियो मेकॅनिक) ३० पदं भरती केली जातील. या भरतीसाठी पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवार अर्ज भरू शकतात.

निवड प्रक्रिया

भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि कागदपत्र व्हेरीफिकेशनच्या आधारावर केली जाईल.

असा करा अर्ज

सर्वप्रथम बीएसएफच्या वेबसाईटवर bsf.gov.in वर जा. येथे होमपेजवर बीएसएफ हेड कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट २०२३ च्या लिंकवर क्लीक करा. अधिसूचना लक्षपूर्वक वाचा आणि रजीस्ट्रेशन करा. अर्जातील सर्व माहिती भरा. सर्व कागदपत्र अपलोड करा. शेवटी अर्ज सबमीट करा. अर्जाची एक प्रींट काढून ठेवा.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: BSF ची भरती निघाली, बारावी पास उमेदवार करू शकतात अर्ज, इतका मिळेल पगारhttps://ift.tt/ytzPY9Z