Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २९ मे, २०२३, मे २९, २०२३ WIB
Last Updated 2023-05-28T19:48:23Z
careerLifeStyleResults

Hindu Dharma: माणूस एकटाच जन्मतो आणि एकटाच मरतो, मग पाप-पुण्याच्या कर्मांचा साक्षी कोण? जाणून घ्या

Advertisement

Hindu Dharma Shastra: आचार्य चाणक्यांच्या नीतीच्या पाचव्या अध्यायात असे म्हटले आहे की 'जन्ममृत्यू हि यात्येको भुनकत्येक: शुभाशुभम्। नरकेषु पतत्येक एको याति परां गतिम्॥' याचाच अर्थ - जीव एकटाच जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, एकटाच पाप आणि पुण्याची फळं भोगतो, एकटाच अनेक प्रकारची दुःखं सहन करतो आणि एकटाच मोक्ष प्राप्त होतो. कारण आई-वडील, भावंडं किंवा कोणीही नातेवाईक त्याच्या दु:खात सहभागी होऊ शकत नाही.

वेद आणि पुराणात धर्म आणि अधर्माचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यामध्ये धर्माला 'पुण्य' आणि अधर्माला 'पाप' म्हटलं आहे. पाप आणि पुण्यासारखी कर्म करण्यासाठी कालमर्यादा नाही. मनुष्य पाप किंवा पुण्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात, एका वर्षात, एका दिवसात किंवा क्षणातही करू शकतो. पण पाप-पुण्याचे भोग हजारो वर्षांतही पूर्ण होत नाहीत. म्हणजेच, तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही पापं किंवा पुण्यं केली असतील, त्या कर्माची फळं तुम्ही जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर तुम्हाला भोगावीच लागतात.

पाप आणि पुण्याच्या कर्मांचा साक्षीदार कोण?

मनुष्य जगात एकटा येतो आणि मृत्यूनंतर एकटाच जातो. स्मशानभूमीत शेवटच्या वेळी कुटुंब निघून जाते आणि आग शरीराला जाळून टाकते. पण मनुष्याने केलेली चांगली-वाईट कृत्यं त्याच्या सोबत जातात आणि त्याच्या कर्माचा फटका तो एकटाच सहन करतो. पण प्रश्न असा आहे की, जीव जन्माला एकटाच येतो आणि एकटाच जातो. तर मग, कोणी गुप्तपणे वाईट कृत्यं केली असतील तर त्याच्या चांगल्या किंवा वाईट कृत्याचा साक्षीदार नेमका कोण?

पाप-पुण्याचे 14 साक्षीदार

ज्याप्रमाणे सूर्य रात्री राहत नाही आणि चंद्र दिवसा राहत नाही, अग्नी देखील सतत धगधगत नाही, पण दिवस, रात्र किंवा संध्याकाळ यातलं कोणीतरी नक्कीच आहे, जे सर्व वेळ आपल्यासोबत असते. जगातही असं काही आहे, जे सदैव आपल्यासोबत असते. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती चुकीची कृत्यं करते, तेव्हा धर्मदेव त्याच्या सूचना देतात आणि त्याची शिक्षा त्या प्राण्याला नक्कीच मिळते. शास्त्रात सांगितलं आहे की, मनुष्य जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याला चौदा साक्षीदार असतात, यापैकी एक किंवा दुसरा साक्षीदार नेहमी माणसासोबत राहतो. मनुष्याच्या कृतींचे 14 साक्षीदार पुढीलप्रमाणे आहेत - सूर्य, चंद्र, दिवस, रात्र, संध्या, पाणी, पृथ्वी, अग्नी, आकाश, वायू, इंद्रिये, वेळ, दिशा आणि धर्म.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/RFcAr9z Veer Savarkar : सावरकरांना फर्ग्युसनच्या वसतिगृहातून काढून टाकलं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

Disclaimer: हा लेख केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथील दिलेल्या कोणत्याही माहितीची एबीपी माझा पुष्टी करत नाही. कोणतीही माहिती आत्मसात करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Hindu Dharma: माणूस एकटाच जन्मतो आणि एकटाच मरतो, मग पाप-पुण्याच्या कर्मांचा साक्षी कोण? जाणून घ्याhttps://ift.tt/kew5IQb