Advertisement

Curd Face Pack: चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. स्किन केअर रूटीनमध्ये फेस पॅकपासून (<a href="https://ift.tt/NZuCjso Pack) ते फेस स्क्रबपर्यंत (<a href="https://ift.tt/1ntawde Scrub) सर्व गोष्टींचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्वचेवरची घाण निघून जाते. त्वचेवरच्या मृत पेशी (Dead Skin Cells) काढून टाकल्याने चेहऱ्यावर चमक येते, त्यासाठी बहुतांश महिला बाजारातील उत्पादनं निवडतात, जी खूप महागही असतात आणि त्यात अनेक केमिकल्स (Chemicals) देखील असतात, ज्यामुळे भविष्यात त्वचेला हानी पोहोचू शकते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला एक किफायतशीर आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. दह्यापासून बनवलेल्या फेसपॅकने तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेऊ शकता. दह्याचा फेस पॅक तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देईल. जाणून घेऊया, दह्याचा फेस पॅक कसा तयार करायचा आणि दह्यात काय मिक्स करून लावल्यास चांगले परिणाम मिळतील.

दही आणि टोमॅटो फेस पॅक

चेहऱ्यावरील घाण काढण्यासाठी तुम्ही दही आणि टोमॅटोचा फेस पॅक लावू शकता. या दोन्ही गोष्टी त्वचेवर जबरदस्त ग्लो आणण्याचे काम देखील करतात. टोमॅटोपासून त्वचेला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी मिळते, त्यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते. हा फेस पॅक चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतो. या फेसपॅकमुळे सनबर्नची समस्या दूर होते, चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. दुसरीकडे दही त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्यात टॅनिंग कमी करण्याची क्षमता देखील असते. या दोन्हीच्या मिश्रणाने त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

पॅक कसा बनवायचा?

दही आणि टोमॅटोचा फेस पॅक बनवण्यासाठी एका टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून त्यात दोन चमचे दही मिसळा. आपला चेहरा धुवा आणि स्वच्छ कापडाने कोरडा करा. त्यानंतर, हा पॅक संपूर्ण चेहरा आणि मानेवर चांगला लावा. 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर चेहऱ्यावर तुमचे मॉइश्चरायझर लावा. फेस पॅक लावल्यानंतर काही तास चेहऱ्यावर साबण वापरणे टाळा.

दही आणि मध फेस पॅक

दही आणि मधाचा पॅक देखील तुमच्या चेहऱ्यावर तेज आणू शकतो. हा पॅक लावल्याने मुरुमांची समस्या दूर होते. दह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लॅक्टिक अॅसिड असते, जे मुरुमांशी लढण्यास मदत करते. दुसरीकडे, मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेचा लालसरपणा आणि सूज दूर करण्याचे काम करतात. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे त्वचेला टोनिंग करण्यास मदत करते. दही आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा गोरी आणि डागरहित दिसते. याशिवाय बारीक रेषा आणि सुरकुत्यांची समस्याही कमी होते.

फेस पॅक कसा बनवायचा?

दही आणि मधाचा फेस पॅक बनवण्यासाठी दोन चमचे दही एक चमचा मधात मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. या फेस पॅकच्या नियमित वापराने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/vDSELFy Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care: चेहऱ्यावर साचलेली घाण काढण्यासाठी दह्यात मिसळा 'ही' गोष्ट; चेहरा उजळेलhttps://ift.tt/WO8ak76
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Skin Care: चेहऱ्यावर साचलेली घाण काढण्यासाठी दह्यात मिसळा 'ही' गोष्ट; चेहरा उजळेलhttps://ift.tt/WO8ak76