Advertisement

<a href="https://ift.tt/rMT7ujO Wari 2023 : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (<a href="https://ift.tt/KmMVgXq Eknath Shinde) मुंबई येथून विमानाने सोलापूरला येऊन तेथून हेलिकॉप्टरने दुपारी चार वाजता पंढरपूरमध्ये (<a style="color: #0014ff;" href="https://ift.tt/MjoaDvk) दाखल होणार आहेत. आज मंत्रिमंडळातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Tanaji Sawant), शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade), कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अशी मंत्र्यांची फौज पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. याचसोबत केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे देखील आषाढी सोहळ्यासाठी पोहोचणार आहेत.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसीय पंढरपूर दौरा

मुख्यमंत्री दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहावर पोहोचल्यावर येथे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण वारीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर सोलापूर वनविभागाने तयार केलेल्या कॉफी टेबल बुक्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. सायंकाळी पाच वाजता पंचायत समिती येथे आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप होणार आहे. यानंतर पुन्हा मुख्यमंत्री विश्रामगृहावर येणार असून यानंतरचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

उद्या पहाटे म्हणजे 29 जूनच्या पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जाणार आहेत. शासकीय पूजेनंतर मंदिर समितीकडून होणार सत्कार स्वीकारून पहाटे साडे चार वाजता विश्रामगृहाकडे निघणार आहेत. 29 जून रोजी सकाळी 10 वाजता विश्रामगृह येथे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे . सकाळी अकरा वाजता तीन रस्ता येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत. दुपारी आडे अकरा वाजता तीन रस्ता येथे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबिरात जाऊन वारकऱ्यांशी संवाद आणि महाशिबीराची पाहणी करणार आहेत. दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणार असून तेथून पुन्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सोलापूरकडे रवाना होतील.

केसीआर यांची अख्खं मंत्रिमंडळ आणि शेकडो गाड्यांसह सोलापुरात सिंघम स्टाईल एन्ट्री

दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कालच (27 जून) विठुरायाचं दर्शन घेतलं. के चंद्रशेखर राव त्यांच्या 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह सोमवारी (26 जून) सोलापुरात दाखल झाले. चंद्रशेखर यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, त्यांच्या सर्व आमदार आणि खासदार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं.

हेही वाचा

<a class="topic_text" title="Pandharpur : फक्त मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनाच व्हीआयपी दर्शन; बाकी मंत्री, आमदार-खासदारांनी सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शन " href="https://ift.tt/bHJe2za : फक्त मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनाच व्हीआयपी दर्शन; बाकी मंत्री, आमदार-खासदारांनी सर्वसामान्यांच्या रांगेतून दर्शन

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi Wari 2023 : मुख्यमंत्री आज दुपारी पंढरीत येणार, सोबत मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री उपस्थित राहणारhttps://ift.tt/OQEXRbo
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Ashadhi Wari 2023 : मुख्यमंत्री आज दुपारी पंढरीत येणार, सोबत मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री उपस्थित राहणारhttps://ift.tt/OQEXRbo